राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नवीन वर्षात त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आल्या आहेत. यंदा त्या पंजाबी मूडमध्ये दिसत आहेत. अमृता फडणवीसांच्या या नव्या गाण्याचे बोल ‘आज मैं मूड बना लिया’ असे आहेत. या गाण्याचा व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला आहे. बॅचलर्सवर हे गाणे आधारित आहे. नवीन गाण्यात अमृता गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत.
टी सिरीजच्या या गाण्याचा टिझर 5 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते या गाण्याची वाट पाहात होते. तसेच अमृता फडणवीस यांनीही तीन दिवसांपूर्वी त्यांच्या नवीन गाण्याचे पोस्टर सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले होते.
अमृता फडणवीस या एक बॅंकर असून त्यांना गायनाची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत बरीच गाणी गायली असून त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम
’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली आहे.
अमृता फडणवीस यांच्या लूकची चर्चा
अमृता फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी या गाण्यातील त्यांच्या लूकचा फोटो शेअर केला होता. यात त्या निळी जिन्स आणि पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतात. यावर त्यांनी गुलाबी रंगाचा ओव्हरकोट परिधान केला आहे. सोबत या ट्रेंडी लूकसोबत त्यांनी पारंपरिक दागिन्यांचे फ्युजन आपल्या लूकला दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या या नव्या लूकचीही बरीच चर्चा बघायला मिळाली.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक नवे गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. स्वतः अमृता फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे. सोशल मीडियावरून अमृता यांनी याबद्दल माहिती दिली आहे.