मुंबई – यंदा दोन वर्षानंतर ‘माणदेशी महोत्सव’ पुन्हा मुंबईमध्ये परतला आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर बहुप्रतिक्षित असा हा पाचवा माणदेशी महोत्सव यंदा ५ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. ५ जानेवारी सकाळी १०.३० वाजता माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन मान.श्री. आशुतोष गोवारीकर (सिने निर्माता) मान. श्रीमती मृणाल कुलकर्णी (अभिनेत्री) यांच्या हस्ते होणार आहे.
माणदेशी महोत्सवाला भेट द्या. तुमची भेट या आपल्या माणदेशी भगिनींचं मनोधैर्य वाढवेल. ५, ६, ७, ८ जानेवारी दरम्यान सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत कधीही भेट देता येणार आहे. हा महोत्सव सर्वासाठी मोफत आहे. आपल्या या माणदेशी भगिनींना प्रोत्साहीत करण्य़ासाठी माणदेशी महोत्सवास आवर्जून भेट द्या, असे आवाहन माणदेशीच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी मुंबईकरांना केले आहे.
“माणदेशी महोत्सव” २०२३
ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा महोत्सव
चार दिवसाच्या कार्यक्रमाची रुपरेषा –
गुरुवार, ५ जानेवारी – पहिला दिवस – उद्घाटन सोहळा – ११.०० वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
गझी लोकनृत्य सादरीकरण – सायंकाळी ६.०० वाजता.
शुक्रवार, ६ जानेवारी – दुसरा दिवस – प्रसिद्ध भारुडकार चंदा तिवाडी यांचे भारुडाचे सादरीकरण – सायंकाळी ६.०० वाजता.
शनिवार, ७ जानेवारी – तिसरा दिवस – महिला कुस्ती स्पर्धा, सायंकाळी ६.०० वाजता.
रविवार, ८ जानेवारी – चौथा दिवस – माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनींची संघर्षगाथा सादरीकरण, सायंकाळी ६.०० वाजता.
रात्री ९.३० वाजता माणदेशी महोत्सवाची सांगता.
अधिक माहितीसाठी
अर्चना सोंडे
८१०८१०५२२९