अभिनेत्री मधुरा देशपांडेचं तीन वर्षांनंतर मालिका विश्वात दमदार पुनरागमन
स्टार प्रवाहची नवी मालिका ‘शुभविवाह’मध्ये साकारणार भूमी ही व्यक्तिरेखा
* सिने प्रतिनिधि
स्टार प्रवाहवरील सर्वच मालिकांना रसिक प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना देण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. प्रेक्षकांची दुपार आणखी खास करण्यासाठी १६ जानेवारी पासून स्टार प्रवाह परिवारात दाखल होतेय नवी मालिका ‘शुभविवाह’. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा देशपांडे या मालिकेत झळकणार असून तीन वर्षांनंतर ती शुभविवाहच्या निमित्ताने मालिका विश्वात पुनरागमन करणार आहे. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका.
भूमी या व्यक्तिरेखेविषयी सांगताना मधुरा म्हणाली, ‘तीन वर्षांच्या गॅपनंतर मी मालिकेत काम करत आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होत आहे. भूमी हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. कारण भूमीसारखी इतका पराकोटीचा त्याग करणारी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारते आहे. कुटुंबावर भऱभरुन प्रेम करणारी भूमी कुटुंबाच्या सुखासाठी काहीही करु शकते. भूमीचे नवनवे पैलू मला दररोज उलगडत आहेत. आमची टीम खूप छान आहे. त्यामुळे शुभविवाहच्या निमित्ताने एक छान कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी भावना मधुरा देशपांडेने व्यक्त केली.’ तेव्हा १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता पाहायला विसरु नका नवी मालिका शुभविवाह.’