कॅडिला फार्मा-समर्थित आयआरएम (IRM) एनर्जी लिमिटेड, ही भारतातील सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (“CGD”) कंपनी आहे, जी शहरी किंवा स्थानिक नैसर्गिक वायू वितरण नेटवर्क घालणे, बांधणे, ऑपरेट करणे आणि विस्तार करणे या व्यवसायात समाविष्ट असून, तिने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO)द्वारे निधी उभारण्यासाठी बाजार नियामक, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)कडे, ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केले आहे.
10 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्यासह हा सार्वजनिक इश्यू, 10,100,000 इक्विटी शेअर्सपर्यंतच्या शेअर्सचा संपूर्ण ताजा इश्यू आहे. ऑफरमध्ये, पात्र कर्मचार्यांच्या सबस्क्रिप्शनसाठी आरक्षण देखील समाविष्ट आहे.
ही ऑफर, बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे देऊ केली जात आहे, ज्यामध्ये ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा, पात्र संस्थात्मक खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल, ऑफरच्या 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा, संस्थागत बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असेल आणि ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला हिस्सा, किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल.
ही कंपनी, इश्यूसाठी आघाडीच्या बँकर्सशी सल्लामसलत करून, 2,000,000 इक्विटी शेअर्ससाठी आयपीओ पूर्व (Pre-IPO) प्लेसमेंटचा विचार करू शकते. असे प्लेसमेंट पूर्ण झाल्यास, इश्यूचा आकार त्यानुसार कमी केला जाईल.
या ताज्या इश्यूमधून मिळालेल्या 307.26 कोटी रुपयांच्या रकमेचा उपयोग, आर्थिक वर्ष 2024, 2025 आणि 2026मध्ये, नमक्कल आणि तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) या भौगोलिक भागात शहर गॅस वितरण नेटवर्कच्या विकासासाठी भांडवली खर्चाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि 167.50 कोटी रुपयांचा उपयोग, कंपनीने घेतलेल्या सर्व किंवा काही थकित कर्जाच्या काही भागाची मुदतपूर्व परतफेड किंवा परतफेड करण्यासाठी केला जाईल.
प्रवर्तकांकडे अहमदाबाद स्थित कंपनीचे 67.94% शेअर्स आहेत, ज्यातील बहुतांश शेअर्स, कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेड (49.50%)कडे आहेत आणि उर्वरित शेअर्स, आयआरएम (IRM) ट्रस्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय विश्वस्त, डॉ. राजीव इंद्रवदन मोदी यांच्याकडे आहेत.
आयआरएम एनर्जी लिमिटेड (IRMEL)ने, जुलै 2017मध्ये, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळा (“PNGRB”)द्वारे पुरस्कृत, बनसकांठा आणि फतेहगढ साहिब येथे त्यांचे कार्य सुरू केले आणि उच्च सुरक्षा मानके राखत, स्पर्धात्मक किमतीत, त्यांच्या पाइपलाइन आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) स्टेशन नेटवर्कद्वारे भौगोलिक क्षेत्रातील ग्राहकांच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले.
ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP)मध्ये नमूद केलेल्या क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड (CRISIL)च्या अहवालानुसार, कंपनी, घरगुती घरांद्वारे तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक युनिट्सद्वारे वापरले जाणारे पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) आणि मोटार वाहनांमध्ये वापरण्यासाठी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) पुरवते आणि ही कंपनी घरगुती, व्यावसायिक आस्थापना आणि औद्योगिक एककांसाठी सर्वात सुरक्षित, स्वच्छ आणि सर्वात किफायतशीर इंधन पुरवठादारांपैकी, तसेच वाहतूक विभागातील इंधनाच्या गरजांसाठी, एक कंपनी आहे.
कंपनी, बनासकांठा (गुजरात), फतेहगढ साहिब (पंजाब), दीव आणि गिर सोमनाथ (दमण आणि दीव/गुजरात केंद्रशासित प्रदेश), आणि नमक्कल आणि तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथे कार्यरत असून, ती, 30 सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत,168 औद्योगिक ग्राहक, 202 व्यावसायिक ग्राहक, 43,183 घरगुती ग्राहक यांना सेवा पुरवत आहे.
आपल्या व्यवसायाच्या संधींचा फायदा घेण्यासाठी, आयआरएमईएल (IRMEL)ने, नैसर्गिक वायू विक्रीच्या प्रमाणानुसार, जपानमधील चौथी सर्वात मोठी गॅस कंपनी असलेल्या शिझुओका गॅस कंपनी लिमिटेड, जपान (“शिझुगॅस”)सह, आयआरएमईएल (IRMEL)मध्ये खाजगी प्लेसमेंटद्वारे भांडवल पुरवून, धोरणात्मक आणि तांत्रिक भागीदारीत प्रवेश केला. दुसरीकडे, व्यवसायाचे एकत्रीकरण साध्य करण्यासाठी, त्यांनी फार्म गॅस प्रायव्हेट लिमिटेड, वेणुका पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड, नि होन सिलिंडर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गुंतवणूक केली. याव्यतिरिक्त, एक ऊर्जा-अभिमुख कंपनी बनण्याच्या संक्रमणाच्या दृष्टीकोणासह, पाच वर्षांच्या कालावधीसाठी डीलर-ओन्ड-डीलर-ऑपरेटेड (DODO) स्टेशन्स आणि कंपनी-ओन्ड-कंपनी-ऑपरेटेड (COCO) स्टेशन्सवर इलेक्ट्रिक व्हेईकल (“EV”) चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्थापनेसाठी मिंद्रा ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करारा (“MoU”)वर स्वाक्षरी केली आहे.
30 सप्टेंबर, 2022 पर्यंत, आयआरएमईएल (IRMEL)ने 56 कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) फिलिंग स्टेशन्सचे नेटवर्क स्थापित केले होते, ज्यामध्ये 2 कंपनीच्या मालकीचे आणि तिच्या द्वारे चालवले जाणारे (“COCO स्टेशन”), 30 मालकीचे आणि डीलर्सद्वारे चालवले जाणारे (“DODO स्टेशन”) आणि 24 तेल विपणन कंपन्यांच्या मालकीचे आणि त्यांच्याद्वारे चालवले जाणारे (“OMC स्टेशन”) यांचा समावेश आहे.
आयआरएमईएल (IRMEL)ची स्पर्धा, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही कंपन्यांशी आहे. एजी अँड पी (AG&P) आणि थिंक गॅस डिस्ट्रिब्युशन प्रायव्हेट लिमिटेड सारख्या सिंगापूर-मुख्यालय असलेल्या कंपन्या, भारतात सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD)च्या प्रसिद्ध कंपन्या आहेत, तर फ्रान्स-स्थित टोटल एनर्जी एसई ने, अदानी गॅस लिमिटेडशी भागीदारी करून अदानी टोटल गॅस लिमिटेड (“ATGL”) निर्माण केली आहे, या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. या, महानगर गॅस लिमिटेड, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, आणि गुजरात गॅस कंपनी लिमिटेड सारख्या देशांतर्गत कंपन्यांशी स्पर्धा करतात.
प्रामुख्याने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, पाईप्ड नॅचरल गॅसच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे आणि कनेक्शनच्या उत्पन्नात आणि इतर ऑपरेटिंग महसूलात वाढ यामुळे, 30 सप्टेंबर, 2021 रोजी संपलेल्या सहा महिन्यांत, कंपनीचा ऑपरेशन्सपासूनचा महसूल, 145.38% ने वाढून, रु. 205.45 कोटी वरून, 30 सप्टेंबर. 2022 रोजी संपलेल्या सहा महिन्यांत, रु. 504.12 कोटी झाला आहे. तर, उच्च इनपुट गॅसवरील उच्च खर्चामुळे, करानंतरचा नफा, 30 सप्टेंबर, 2021 रोजी संपलेल्या सहा महिन्यांत 17.91% ने कमी होऊन, रु. 47.81 कोटींवरून, 30 सप्टेंबर, 2022 रोजी संपलेल्या सहा महिन्यांत रु. 39.25 कोटी झाला आहे.