मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरण गोदी विभागातील आउट डोअर डॉक स्टाफ पूजेनिमित्त मेडिकल विभागातर्फे गोदी कामगारांमध्ये रक्तदान विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी 13 डिसेंबर 2022 रोजी इंदिरा गोदीतील हमालेज बिल्डिंग येथे ” नाटकातील नाटक ” हे पथनाट्य सादर करण्यात आले. त्याप्रसंगी सेवानिवृत्त ट्रॅफिक मॅनेजर गौतम डे, आर.एन. शेख, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष निसार युनूस, लेखक व दिग्दर्शक योगिनी दुराफे उपस्थित होते. या नाटकासाठी डॉ. मोकल डॉ. पुरोहित श्री. नागनाथ घाडगे यांचे विशेष सहकार्य मिळाले. या सामाजिक उपक्रमास गोदी कामगारांची चांगली उपस्थिती होती.
सत्यनारायण महापूजेसाठी ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये, युनियनचे पदाधिकारी सुधाकर अपराज, केरसी पारेख, दत्ता खेसे, कल्पना देसाई,विजय रणदिवे, मारुती विश्वासराव, बबन मेटे, विनोद पितळे, बापू घाडीगावकर, उपलेखाधिकारी आनंद कनोजिया, टाइम कीपर बबन हाडवळे, लेबर इन्स्पेक्टर सस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी पूजा समितीचे पदाधिकारी बी, बी. मर्गज, संदीप घागरे, ए.एम. दुबे, एकनाथ फडतरे, रमेश गुरव, संदेश मोरे, हरिभाऊ फालके इत्यादी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.