पुणे, डिसेंबर 2022: पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. ही इटालियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्के उपकंपनी आणि स्कूटर्सच्या प्रतिष्ठित वेस्पा व स्पोर्टी अॅप्रिलिया श्रेणीच्या उत्पादक कंपनीने वेस्पा एसएक्सएल व्हेरिएण्ट्ससाठी चार नवीन आकर्षक रंगांच्या लॉन्चची घोषणा केली आहे. हे नवीन रंग आहेत मिडनाइट डिसर्ट, तुस्कानी सनसेट, जेड स्ट्रिक व सन्नी एस्केपेड.
मिडनाइट डिसर्ट, तुस्कानी सनसेट व सन्नी एस्केपेड या नवीन रंगांमधील नवीन लिमिटेड एडिशन वेस्पा एसएक्सएल स्पोर्ट सादर करण्यात आली आहे आणि वेस्पा एसएक्सएल रेसिंग ६०एस विद्यमान व्हाइट रंगाव्यतिरिक्त जेड स्ट्रिक या नवीन रंगामध्ये सादर करण्यात येईल. प्रमाणित वेस्पा एसएक्सएल मॉडेल्स आता मिडनाइट डिसर्ट व तुस्कानी सनसेट या दोन आणखी नवीन रंगांमध्ये उपलब्ध असतील.
नवीन कलर लॉन्चबाबत बोलताना पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी म्हणाले, ‘’आम्हाला आमच्या भारतीय ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर नवीन स्टाइल व आकर्षकतेसह वेस्पा सादर करण्याचा आनंद होत आहे. वेस्पा ही फक्त स्कूटर नसून इटालियन जीवनशैली व वारसाची आयकॉन आहे, जिला भारतभरातून खूप प्रेम मिळाले आहे. वेस्पाच्या नवीन कलर पोर्टफोलिओसह आमचा ग्राहकांना त्यांच्यासाठी सर्वोत्तम व्हेरिएण्टची निवड करण्याकरिता अनेक निवडी देण्याचा मनसुबा आहे. हे व्हेरिएण्ट्स त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संलग्न होत त्यांना अद्वितीय रायडिंग अनुभव देतील, ज्यामुळे आमचे रायडर्स अचंबित होतील.’’
नवीन रंगांमधील वेस्पा एसएक्सएल व्हेरिएण्ट्स भारतातील सर्व डिलर्सकडे १ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध असतील.
न्यू अडिशन्स:
वेस्पा एसएक्सएल स्पोर्ट (लिमिटेड एडिशन)
किंमत (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) एसएक्सएल १२५: १,३१,९८४ रूपये एसएएक्सएल १५०: १,४५,९३६ रूपये |
वेस्पा एसएक्सएल
किंमत (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) एसएक्सएल १२५: १,३१,९८४ रूपये एसएएक्सएल १५०: १,४५,९३६ रूपये |
वेस्पा एसएक्सएल रेसिंग ६०एस
किंमत (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) एसएक्सएल १२५: १,३७,८०५ रूपये एसएएक्सएल १५०: १,५१,६०४ रूपये |
मिडनाइट डिसर्ट | मिडनाइट डिसर्ट | जेड स्ट्रिक |
तुस्कानी सनसेट | तुस्कानी सनसेट | |
सन्नी एस्केपेड |