त्रिनिदाद : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज टीमचा त्यांच्या घरी पराभव केला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात शिखर धवनने 97 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र या सामन्याच्या अंतिम टप्प्यात घाबरलो असल्याचं मत, शिखर धवनने व्यक्त केलंय.
टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर 309 रन्संचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर विंडीजने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचून आणला. त्यांना शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 15 रन्सची गरज होती. यावेळी मोहम्मद सिराजने केवळ 11 धावा देत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना शिखर धवन म्हणाला, “100 धावा न झाल्याने मी निराश झालो, पण टीमकडून हा चांगला प्रयत्न होता. हा सामना एवढ्या टप्प्यापर्यंत पोहोचेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे सामन्याच्या शेवटाला मी घाबरलो होतो.”
आम्ही शेवटपर्यंत शांत राहिलो आणि एक छोटासा बदल केला. आम्ही फाईन लेगला मागे ढकललं आणि त्यामुळे आम्हाला खरोखर मदत झाली. उर्वरित सामन्यात आम्हाला कामगिरी सुधारायची आहे, असंही धवन म्हणाला.
वनडे सिरीजमधील पहिला सामना भारताने जिंकला असला तरी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी दिलेली चांगली झुंज दिली. टीम इंडियाने समोरच्या टीमला 309 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या टीमने चांगला खेळ केला.
विंडीजकडून काईल मेयर्सने 75 आणि ब्रँडन किंगने 54 रन्स केले. रोमॅरियो शेफर्ड (39) आणि अकील हुसेन (33) यांनी नाबाद भागीदारी करत विंडीजला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र अवघ्या 3 रन्सनी वेस्ट इंडिजचा पराभव झाला.
भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान शुक्रवारपासून (२२ जुलै) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर या मालिकेतील पहिला सामना झाला. ही अतितटीची लढत भारताने तीन धावांनी जिंकली आहे. त्यामुळे भारताला मालिकेत १-० अशी आघाडी मिळाली आहे. भारताने वेस्ट इंडीजला ३०९ धावांचे लक्ष्य दिले होते.
भारताने दिलेले ३०९ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानावर आलेल्या यजमानांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शाय होप सात धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र, कायले मायर्स आणि शमराह ब्रूक्स यांनी दमदार खेळ दाखवत विंडीजच्या डावाला आकार दिला. मायर्सने ७५ आणि ब्रूक्सने ४६ धावा केल्या. त्यापाठोपाठ ब्रँडन किंगने अर्धशतकी खेळी करून संघाला मजबूत स्थितीमध्ये आणले. शेवटी अकील हुसेन आणि रोमरिओ शेफर्ड जोडी भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. शेवटच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी १५ धावांची गरज होती. मात्र, विंडीजचा संघ केवळ ११ धावाच करू शकला.