देशभरात गोवरचा झपाट्याने होणारा प्रसार चिंताजनक आहे. कोविड महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक मुलांना लसीकरण मिळालेले नाही. 800 हून अधिक मुलांना आजवर गोवरची लागण झालेली असून, गोवरचा उद्रेक समाजासाठी गंभीर धोका आहे. असे भाष्य प्रभाग ‘अ’ चे बीएमसी माजी नगरसेवक ‘मकरंद नार्वेकर’ यांनी केले आहे. मुंबई महानगर पालिका साथीच्या आजाराचा सामना करण्यास सक्षम आहे.असे म्हणत त्यांनी काही निरीक्षणे ही नोंदवली.
लसीकरण हा गोवर आटोक्यात आणण्याचा उत्तम उपाय असून मुंबई महानगरपालिका राबवत असलेली शहरव्यापी लसीकरण मोहिम यात महत्वाची भूमिका बजावेल यावर त्यांचा विश्वास आहे.
वकील आणि माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी या विषयावर भाष्य करताना सांगितले की, “दारिद्रय रेषेखालील भागात, लोक मुलांना ही लस देण्यास नापसंती दर्शवतात कारण, त्यानंतर मुलांना ताप येऊ शकतो. त्यांना कामापासून दूर राहून घरी बसणे परवडत नाही. त्यामुळे हे घडते.” महानगरपालिकेने नागरिकांना लसीचे महत्व पटवून देत ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे.
केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईबाबत मकरंद नार्वेकर म्हणतात की त्यांच्या प्रभागाने सक्रिय सहभाग घेतला आणि प्रशासनाला सहकार्य केले. रहिवासी आणि पालकांना संबोधित करताना,त्यांचा असा विश्वास आहे की या प्रतिबंधात तळागाळातील, सर्वसाधारण परिस्थितीतली पालकांना सामील करून घेणे गरजेचे आहे.