हिमाचलप्रदेशच्या मुख्यमंत्री पदी उद्या म्हणजे ११ डिसेंबरला सुखविंदर सिंह सुक्खू विराजमान होणार आहेत. हिमाचलप्रदेशचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील. मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह यांचं नाव चर्चेत होतं. त्या सध्या हिमाचलप्रदेशच्या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आहेत. परंतु, काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि आमदार सुखविंदर सिंह सुक्खू यांच नाव निश्चित झालंय. सुक्खू यांना वीरभद्र सिंह यांचे स्पर्धक मानले जात होते. सुक्खू यांनी गेल्या पाच दशकात हिमाचलप्रदेशातील राजकारणात आलपा दबदबा कायम ठेवला. सुखविंदर सिंह यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं.
सुखविंदर सिंह यांचा जन्म हमीदपूर जिल्ह्यातील नादौन तहसीलीतील सेरा गावात झाला. २६ मार्च १९६४ रोजी त्यांचा जन्म झाला. वडील रसील सिंह हिमाचल परिहवन विभागात चालक होते. आई गृहिणी आहे.
सुखविंदर सिंह शिमला येथे एक दूध काउंटर चालवत असतं. पदवीपर्यंत शिक्षण शिमला येथे घेतले. एनएसयूआयपासून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. संजोलीत स्टुडंट सेंट्रल संघटनेचे अध्यक्ष निवडले गेले. १९८८ ते १९९५ पर्यंत एनएसयूआयचे प्रदेश अध्यक्ष होते.
१९९५ मध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव झाले. सहा वेळा मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे ते स्पर्धक होते. हमीरपूर जिल्ह्यातील एसएस सुक्खू आणि प्रतिभा सिंह या दोघांनीही मुख्यमंत्री पदावर दावा केला. पक्षानं एसएस सुक्खू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. एसएस सुक्खू हे राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात.
काँग्रेस पक्षानं त्यांना प्रचार समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. शनिवारी सर्वसंमतीनं एसएस सुक्खू यांना काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा नेता म्हणून निवडण्यात आले. रविवारी ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.