भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना (ODI) चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
वनडे मालिकेतील सर्वात जलद 200 धावा करणारा इशान किशन (Ishan Kishan Double Century) पहिला खेळाडू ठरला आहे.याआधी सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर होता.गेलने 138 चेंडूत वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक पूर्ण केले होते.भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh ODI) यांच्यातील तीन सामन्यांच्या शेवटच्या सामन्यात इशान किशनने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण करत नवा इतिहास रचला आहे.
इशान किशन सर्वात जलद 150 धावा (Fastest 150 In ODI) करणारा भारतीय फलंदाज ठरलाय. याआधी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या (Virendra Sehwag) नावावर होता.त्याने 112 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या होत्या. इशान किशन चट्टोग्राममध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. तो बांगलादेशविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरलाय. याआधी बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.
बांगलादेशच्या सर्वच गोलंदाजांना त्याने धुतलं. 50 चेंडूत अर्धशतक, 85 चेंडूत शतक, 103 चेंडूत 150 धावा केल्यानंतर या इशान किशनने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले.इशान 131 चेंडूत 210 धावा करून बाद झाला.
24 चौकार आणि 10 षटकार
या ऐतिहासिक खेळीत ईशान किशनने 24 फोर आणि 10 सिक्ससह 156 धावा केल्यात. इशान किशनने दोनशे धावा करत असताना एकामागून एक अनेक विक्रम मोडीत काढले.24 वर्षीय ईशान सर्वात द्विशतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू बनला आहे.
4 वर्षानंतर वनडेमध्ये द्विशतक
इशान किशनच्या आधी रोहित शर्माने वनडेमध्ये तीन वेळा द्विशतक झळकावले आहे.रोहितशिवाय सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, मार्टिन गुप्टिल आणि फखर जमान यांच्या नावावरही वनडे क्रिकेटमध्ये द्विशतके ठोकण्याचा विक्रम आहे. पहिल्यांदा क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा चमत्कार केला होता. वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटचे द्विशतक 2018 मध्ये आले होते. जेव्हा पाकिस्तानच्या फखर जमानने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 210 धावा केल्या होत्या.