कोल्हापूर : अंबाबाईच्या मंदिराबाहेर भाविकाची एक चूक नडली, चप्पल स्टँडवाल्याकडून पैसे परत देण्यास नकार. मंदिर परिसरात चप्पल स्टँड चालक गणेश पाकरे यांच्या चप्पल स्टँडवर आपले चप्पल सोडले. दर्शनानंतर चप्पल घेऊन जात असताना सदर दाम्पत्याने ऑनलाईन पद्धतीने १० रुपये पाकरे यांना दिले. मात्र, याच वेळी सदर दाम्पत्याकडून चुकून ८५०० रुपये चा आणखी एक व्यवहार (ट्रांजेक्शन) झाला.
सध्याच्या ऑनलाईन च्या जमान्यात आपण सर्व व्यवहार हे ऑनलाईन करत आहोत. अशा वेळेस अनेकदा पैसे देताना चुकून एखादा झीरो जास्ती किंवा कमी दाबला जातो आणि तो पैसा दुसऱ्याला मिळतो.अशाच एका ऑनलाईनच्या व्यवहारासंदर्भात कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील एका चप्पल स्टँड चालकाकडे ग्राहकाकडून चुकून जास्ती ऑनलाईन पैसे गेले. मात्र सदर ग्राहक ते पैसे पुन्हा मागण्यास गेले असता सदर ग्राहकास आणि सोबत असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करत आणि कपडे काढत अर्धनग्न होत पोलीस ठाण्यातच धिंगाणा घातल्या प्रकरणी सदर चप्पल स्टँड चालकविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात सर्व जण ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहेत.अगदी एक रुपया पासून ते करोडोची उलाढाल अगदी काही मिनिटात ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. मात्र, जरी हा व्यवहार करायला कमी वेळ लागत असला आणि आपला फायदा होत असला तरी दुसऱ्या बाजूला वेळ बचत करण्याच्या नादात ऑनलाईन व्यवहार करताना न घेतलेल्या काळजीने एका दाम्पत्याला पोलीस स्टेशन गाठावे लागले आहे.