मध्य प्रदेशमधील छत्तरपूर येथील दीपक साहू आणि राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील कृष्णांशू तन्वर यांच्यात अनेक गोष्टी साम्य आहेत. ते दोघेही वैद्यकीय विद्यार्थी आहेत, त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय (जेएनव्ही) शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे, दोघेही साधारण पार्श्वभूमीच्या कुटुंबामध्ये मोठे झाले आहेत आणि त्यांच्यासाठी शिक्षण हे लक्झरी होते. टाटा मोटर्सच्या एनेबल उपक्रमांतर्गत नीट (NEET) कोचिंगमध्ये त्यांची ओळख करून दिली नसती तर कदाचित त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले नसते. दीपकने नीट (NEET) २०२० मध्ये ७२० पैकी ७१५ गुण मिळवले आणि ऑल-इंडिया रँक #5 होता. त्याने एम्स दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. कृष्णांशूने NEET) २०२० मध्ये ७२० पैकी ७०५ गुण गुण मिळवले आणि त्याचा ऑल-इंडिया रँक #53 होता. तो आता दिल्ली येथील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे.
कृष्णांशू आणि दीपक सारख्या पात्र विद्यार्थ्यांना दर्जेदार कोचिंगद्वारे देशातील प्रमुख उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील टाटा मोटर्सने जानेवारी २०२१ मध्ये नवोदय विद्यालय समिती (एनवहीएस), अवंती फेलोज आणि एक्स-नवोदयन फाउंडेशन यांच्यासोबत सहयोगाने अभियांत्रिकी आणि नीट (नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट) अॅडमिशन ब्रिज एक्सेलरेटेड लर्निंग एंगेजमेंट उपक्रम – एनेबल सुरू केला., कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आदेशात लक्ष केंद्रित करणारा मुख्य स्तंभ विद्याधनमचा एक महत्त्वाचा भाग असलेला एनेबल हा डिजिटल-सक्षम रिमोट लर्निंग उपक्रम आहे, जो देशातील ५५२ जवाहर नवोदलय विद्यालयांमध्ये (जेएनव्ही) शिकत असलेल्या इयत्ता ११वी व १२वी च्या हुशार विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट (NEET) स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सक्षम करतो. तसेच संसाधने उपलब्ध करून देण्यासोबत माग्रदर्शन करतो, जे अन्यथा उपलब्ध होऊ शकत नाही. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये टाटा मोटर्सने ३४०० विद्यार्थ्यांना भारतातील सर्वोच्च अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नोंदणी करण्यास मदत केली आहे, ज्यापैकी ४० टक्के विद्यार्थीनी आहेत.
एनेबल डिजिटल माध्यमांच्या लाभांचा पाठिंबा असलेले लक्ष्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण मूल्यांकनासह क्षेत्रातील अग्रणी, मोफत कोचिंग देते. देशातील इतर कोणत्याही प्रमुख कोचिंग प्रोग्रामच्या तुलनेत प्रति यशस्वी विद्यार्थी २० पट कमी खर्चासह एनेबलने एसटीईएम (STEM) मधील उच्चभ्रू महाविद्यालयांमध्ये १० पट वाढ करण्यात मदत केली आहे. एकूणच, या उपक्रमाचा पाठिंबा असलेले ३५ टक्के विद्यार्थी देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश करतात.
एनेबल उपक्रमाच्या यशाबाबत बोलताना टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख श्री. विनोद कुलकर्णी म्हणाले, “देशातील तरूणांना निपुण करण्याप्रती कटिबद्ध जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून टाटा मोटर्सने सतत सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर भर दिला आहे. आमच्या सीएसआर उपक्रमामधील लक्ष केंद्रित करणारा प्रमुख स्तंभ विद्याधनम शिक्षणाला प्रबळ करण्यासाठी अधिक पुढाकार घेण्यासाठी समर्पित आहे. एनेबल माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकडे जाण्याच्या प्रवासात त्यांच्या प्रयत्नांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि सेवेपासून वंचित समाजातील होतकरू तरुणांना त्यांच्या अभियांत्रिकी व वैद्यकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत प्रदान करण्याचा प्रयत्न करते. हा उपक्रम मुलभूतपणे डिजिटायझेशनच्या फायद्यांद्वारे अधोरेखित करण्यात आला आहे आणि संपूर्ण भारतातील नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय परिणामांसह आम्हाला प्रवेशयोग्यतेचा लक्षणीय विस्तार करण्यात मदत केली आहे. येत्या काही वर्षांमध्ये आम्ही एनेबलची व्याप्ती आणि प्रभाव वाढवण्याची आशा करतो, ज्यामुळे अनेक प्रतिभावान मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत होईल.”
हा उपक्रम प्रथम २०११ मध्ये पुदुचेरीमध्ये राबवण्यात आला आणि त्यानंतर मंगलोर, पालघर, कोल्हापूर व राजगीर येथील जेएनव्हींमध्ये राबवण्यात आला. या उपक्रमाने जानेवारी २०२१ मध्ये डिजिटल अध्ययन मॉडेलमध्ये परिवर्तन घडवून आणला आणि देशातील २६ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांमधील संपूर्ण जेएनव्ही सिस्टिमचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.
स्थापनेपासून ४५,००० हून अधिक विद्यार्थी एनेबलचा भाग आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये १०,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा दिली, त्यापैकी ४२ टक्के विद्यार्थी जेईई मेन्समध्ये उत्तीर्ण झाले, तर ११ टक्के विद्यार्थी जेईई अॅडवान्स्डमध्ये उत्तीर्ण झाले. यापैकी ७० टक्के पात्र जेईई अॅडवान्स्ड विद्यार्थ्यांनी टॉप १०,००० मध्ये स्थान मिळवले आणि त्यांच्यापैकी ३८ टक्के विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला, ज्यामध्ये ४० टक्के विद्यार्थीनी होत्या. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला. नीटसाठी १२ टक्के पात्र विद्यार्थ्यांनी टॉप १० वैद्यकीय संस्थांमध्ये स्थान मिळवले.
डिजिटल शिक्षणात प्रवेश वाढवण्याचा प्रयत्न करत या उपक्रमाने ऑनलाइन क्लासेस, गृहपाठ आणि साप्ताहिक चाचणीद्वारे महामारीच्या काळात इच्छुक विद्यार्थ्यांना होम-लर्निंगमध्ये महत्त्वपूर्ण मदत केली आहे. आज, ते डिजिटल साधने व संसाधनांसह आपल्या अध्यापन व अध्ययन करण्याच्या प्रयत्नांना वाढवत आहेत, यूट्यूब आणि झूमद्वारे तज्ञ शिक्षकांचे वर्ग लाइव्ह प्रसारित करत आहेत. ऑनलाइन वर्ग चालवण्यासाठी पायाभूत सुविधांची काळजी महाविद्यालये आणि नवोदय विद्यालय समिती (एनव्हीएस) द्वारे घेतली जाते, तर साप्ताहिक चाचण्या व अहवालांसह अवंती व ईएनएफ लाइव्ह क्लासेस घेतात. अधिक पुढे जात या उपक्रमाचा १५००० विद्यार्थ्यांना उच्च रोजगारक्षमता एसटीईएम अभ्यासक्रम जसे (अभियांत्रिकी, औषध, फार्मसी, नर्सिंग आणि कृषी) यांमध्ये प्रवेश देण्याचा प्रयत्न आहे.