…सेंटर ऑफ एक्सलन्स उभराणाच्या दिशेने प्रयत्न सुरू….
डिसेंबर २०२२: भारताची अग्रगण्य बायोफार्मास्युटिकल कंपनी भारत सीरम्स अँड व्हॅक्सिन्स लिमिटेडने (BSV), आज आपल्या अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टमध्ये (महाराष्ट्र) एक जागतिक दर्जाचे Animals टेस्टिंग फॅसिलिटी (द फॅसिलिटी) आणि क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी सुरू केली. जागतिक आरोग्य संघटना (WHO), फार्मासोपिया (भारत, युनायटेड स्टेट्स, ब्रिटिश आणि युरोपियन), OECD GLP, सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्डस् कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) आणि स्टेट फूड अँड ड्रग ऑथोरिटी (FDA) यांच्याद्वारे विहित आवश्यकतांबरहुकुम या फॅसिलिटीमध्ये उच्च विद्याविभूषित डॉक्टरेट्स, पशुवैद्य, जैवतंत्रज्ञ आणि जैवशास्त्रज्ज्ञांची टीम कार्यरत आहे. या फॅसिलिटीमध्ये भारत सरकारच्या CPCSEA द्वारे नियुक्त करण्यात आलेली इन्स्टिट्यूशनल अॅनिमल एथिक्स कमिटी (IAEC) असून प्राण्यांवरील चाचण्यांसाठीच्या प्रोटोकॉलवर देखरेख ठेवण्याचे व त्यांना मान्यता देण्याचे काम ही कमिटी करते. अशा मान्यतेनंतर प्राण्यांची पैदास केली जाते आणि राष्ट्रीय कायद्यांत सांगितल्याप्रमाणे वैज्ञानिक व नैतिक नियमांनुसार चाचण्या केल्या जातात. याशिवाय चालू प्रमाण पर्यावरण कायद्यांनुसार फॅसिलिटीमध्ये निर्माण होणा-या जैविक व इतर कच-याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यासाठी BSV ने सरकारमान्य व्हेंडर्सशी करारही केला आहे.
“नवे औषध लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी आमची धडपड सुरू असते आणि त्यादृष्टीने सुरू झालेली BSV ची Animals टेस्टिंग फॅसिलिटी म्हणजे वैज्ञानिक संशोधनाची कक्षा विस्तारण्याच्या बाबतीत आमच्या कटिबद्धतेचे मूर्त रूप आहे. येत्या काळामध्ये ही फॅसिलिटी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये परिवर्तीत करायला आम्हाला आवडेल आणि रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळवून देणारे अचूक, सुरक्षित, उच्च दर्जाचे व सातत्यपूर्ण परिणाम मिळण्याची हमी देणा-या चांगल्या लॅबोरेटरी कार्यपद्धतींचे अत्यंत काटेकोरपणे पालन करत आम्ही OECD GLP प्रमाणन मिळविण्याच्या दिशेने काम करत आहोत,” BSV चे एमडी आणि सीईओ संजीव नवांगुळ म्हणाले.
“आमच्या रुग्णांना दर्जेदार उत्पादने आणि अधिक सुरक्षित उपचार पुरविण्यावर आम्ही नेहमीच भर देत आलो आहोत. फॅसिलिटीमध्ये हाती घेण्यात येणारे संशोधन हे पशुकल्याण व ठोस वैज्ञानिक तार्किकतेवर आधारित असावे, व हे करताना यासंदर्भातील सर्व शासकीय कायद्यांचे काटेकोर पालन व्हावे याची खातरजमा आम्ही करतो. विशेष प्रशिक्षण लाभलेल्या येथील वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचारीवर्गाच्या नियमितपणे आरोग्य तपासण्या केल्या जातात, त्यांना अग्निसुरक्षा, आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रथमोपचार आणि अशाप्रकारच्या इतर आंतरराष्ट्रीयदृष्ट्या आवश्यक बाबींचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे.” BSVच्या क्वालिटी विभागाचे प्रेसिडंट डॉ. संजीब कुमार मिश्रा म्हणाले.