ठाणे, डिसेंबर ०६, २०२२: लोढा या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या रिअल इस्टेट विकासक कंपनीने अनेक प्रतिभावान उदयोन्मुख क्रिकेटर्सच्या प्रकाशझोतात न आलेल्या क्षमता निपुण करण्यासाठी अप्पर ठाणे येथे क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन केले. रविवार ४ डिसेंबर रोजी या उद्घाटनाप्रसंगी दिग्गज माजी भारतीय क्रिकेटर श्री. संजय मांजरेकर यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी अनेक तरूण क्रिकेटप्रेमी उपस्थित होते, ज्यांना श्री. मांजरेकर यांच्याशी परस्परसंवाद साधण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला.
अप्पर ठाणे लोढा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पूर्ण आकाराची खेळपट्टी असलेले क्रिकेट मैदान आहे. ‘बिल्डिंग ए बेटर लाइफ’ या आमच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून संचालित हा उपक्रम मुलांना आज जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम प्रशिक्षण आणि क्रीडा कौशल्य पद्धतींचा वापर करून खेळात त्यांची पूर्ण क्षमता दाखवून देण्यासाठी प्रेरणा देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
तसेच अप्पर ठाण्यातील क्रीडा सुविधांमध्ये फुटबॉल मैदान, टेनिस कोर्ट आणि बास्केटबॉल कोर्ट यांसह सचोटी, टीमवर्क, धमाल, व्यावसायिकता आणि अनुकूलता या मुलभूत मूल्यांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रशिक्षण उपक्रमाचा समावेश आहे.
अप्पर ठाणे येथील लोढा २०० एकर जागेवर पसरलेले आहे. ८० टक्क्यांहून अधिक जागा खुली आहे आणि हजारो झाडे व शुद्ध हवेचा अनुभव मिळण्यासोबत ५०,००० चौरस फूटांचे भव्य क्लबहाऊस आहे, ज्यामध्ये उत्साहवर्धक पोहण्याचा आनंद घेण्यासाठी स्विमिंग पूल आहे. या विकासामध्ये थिएटर, जिम आणि शोभिवंत बँक्वेट हॉल देखील आहे.