मुंबई, १ डिसेंबर २०२२- फ्रोएक्स्पो २०२२ या भारतातील सर्वाधिक आवडीच्या आणि विश्वसनीय अशा फ्रोएक्स्पो २०२२ या ट्रेड शो आणि परिषदेच्या १२६ व्या पर्वाचे आयोजन २ आणि ३ डिसेंबर २०२२ दरम्यान फ्रॅन्चाईज इंडिया द्वारे करण्यात येत असून हे आयोजन हॉल नं ४, मुंबई कन्व्हेन्शन ॲन्ड एक्झिबिशन सेंटर मुंबई येथे करण्यात आले आहे.
फ्रोएक्स्पो२०२२ , मुंबई येथे १० हजारांहून अधिक व्यावसायिक खरेदीदारांसह २५० हून अधिक प्रदर्शक ब्रॅन्ड्स ने भाग घेतला आहे. दोन दिवस चालणार्या या शो चे आयोजन फ्रॅन्चाईज इंडिया या एशियातील सर्वांत मोठ्या एकात्मिक फॅन्चाईज उपाय देणार्या कंपनी कडून करण्यात येत असून यामध्ये नवोदित व्यावसायिकांना गुंतवणूकदारांसह ग्राहकांनाही भेटण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये ट्रेड शो सह अनेक उपक्रमांचे आयोजन करणृयात येत असून या एक्स्पो मधील कार्यक्रमांमुळे ते त्यांच्या व्यवसाया विषयी योग्य निर्णय घेऊ शकतील. भारतात फ्रॅन्चाईजिंग बाजारपेठ ही गेल्या पाच वर्षांत ३०-३५ टक्क्यांनी वाढलेली दिसून आली आहे. असे दिसून येते की जगभरांतील उलाढाल ही ९३८ बिलियन रुपयांची झाली. फ्रॅन्चाईजिंग क्षेत्र हे भारताच्या जीडीपी मध्ये १.८ टक्क्यांची भर घालत असून अशी आशा आहे की २०२२ मध्ये हे योगदान ४ टक्के असेल.
“ व्यवसाय करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे तो तुम्ही न करता फ्रॅन्चाईजिंग करुन करणे. फ्रो एक्स्पो मुळे तुम्हाला व्यावसायिकांबरोबर भेटून त्यांच्याकडून व्यवसायाची माहिती आणि कंपन्यांना एकत्र भेटण्याची संधी प्राप्त होत आहे.” असे फ्रॅन्चाईज इंडिया मिडिया च्या एडिटर इन चीफ रितू मार्या यांनी सांगितले.
“ भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून फ्रॅन्चाईजी व्यवसायात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तरुणांची वाढती लोकसंख्या पाहता भारतात फ्रॅन्चाईज क्षेत्र ही येत्या काही दिवसात वाढतांना दिसेल. त्याच बरोबर फ्रॅन्चाईजी व्यवसायांत वाढ होऊ लागल्यामुळे सुध्दा अनेक क्षेत्रात रोजगारनिर्मितीही होऊ शकेल.” रितू मार्या म्हणतात.
फ्रो एक्स्पोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्टार्टअप समिट २०२२ ही असून यामध्ये स्टार्ट अप कडून कशा प्रकारे व्यावसायिक उत्कृष्टता आणि वृध्दी विषयी सर्व गोष्टींवर चर्चा होणार आहे. त्याच बरोबर १०० हून अधिक व्यावसायिक व आंतरराष्ट्रीय तज्ञां बरोबर चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या परिषदेत व्यावसायिक घराण्यांतील दिग्गज, नाविन्य प्रदाते, भांडवलदार, व्यावसायिक मॉडेल्स निर्माते, सल्लागार, योजनाकर्ते, शिक्षण तज्ञ, सहकार्य कर्ते, व्यावसायिक प्रशिक्षक आणि व्यावसायिक जे छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना त्यांच्या शिक्षण आणि अनुभवातून समजलेल्या गोष्टींचे ज्ञान देतील.
दि स्टार्ट अप समिट ला बाजारपेठेतील तज्ञ एकत्र आले होते व पहिल्या सत्रात न्यू शॉपर्स साठी ओम्नीचॅलन वे फॉरवर्ड फॉर अ ब्रॅन्ड विषयी चर्चा करण्यात आली. नवीन नियम – न्यू नॉर्मल मधील कनेक्टेड कॉमर्स- रिटेल मेगाट्रेन्ड्स वर ही चर्चा झाली.
यावेळी माहिती देतांना रिलयान्स प्रिमियम ग्रोसरी रिटेल च्या स्ट्रॅटेजी, ब्रॅन्ड अलायन्स ॲन्ड जनरल मर्कंडाईज चे प्रमुख हमीद खान यांनी सांगितले “ओम्नीचॅनल म्हणजे सर्व चॅनल्स चा सर्वोत्कृष्ट अनुभव असणे. त्यामुळे त्या चॅनलची योग्य निवड करा कारण तुमच्या व्यवसायाचा अजोड अनुभव ग्राहकांना प्राप्त होणे आवश्यक आहे.”
आपला अनुभव व्यक्त करतांना वंडरशेफ होम ॲप्लायन्सेस चे एमडी रवी सक्सेना यांनी सांगितले “ बाजारपेठेतील प्रत्येक व्यक्तीचे हे स्वप्न असते की ग्राहकांना समजून घेणे पण त्याच बरोबर काय, कशासाठी आणि कशा प्रकारे ग्राहक खरेदी करतो हे समजून घेणे कठीण असते. डिजिटल पध्दती मुळे ग्राहकांना ओळखणे शक्य होते. आमच्या ग्राहकांपैकी ३३ टक्के ग्राहक हे डिजिटल आहेत.”
एक्स्पो चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फ्रॅन्चाईज स्टार्ट अप ॲवॉर्ड्स होते यामध्ये फ्रॅन्चाईज तत्वावर यशस्वी संस्थांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणज इंडिया इव्ही कॉन्फेक्स ॲन्ड ॲवॉर्ड्स होत. यामध्ये बाजारपेठेतील दिग्गज एकत्र येऊन त्यांनी आपले यशस्वी विचार व्यक्त केले. त्याच बरोबर आव्हाने आणि भविष्यकाळातील संधीं विषयी चर्चा केली. त्याच बरोबर त्यांनी नमूद केले की कशा प्रकारे त्यांच्या संस्थेने स्वच्छ उर्जे ने युक्त वाहतूकीत कसा बदल घडवला.
या शो मध्ये फ्रॅन्चाईजिंग, रिटेलिंग आणि लायसेन्सिंग वर आधारीत सर्वसमावेश गोष्टी पहायला मिळाल्या. फ्रोएक्स्पो २०२२ मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणावरील फ्रॅन्चाईजिंग, रिटेलिंग, लायसेन्सिंग, रिअल इस्टेट आणि रिटेलिंग सप्लाय चेन विषयी विविध बाजारपेठांमधील माहिती देण्यात आली.
फ्रो एक्स्पो २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशाल कार्यक्रमा मध्ये ‘टॉप १०० फ्रॅन्चाईज लीडर्स’ या दि फ्रॅन्चाईजिंग वर्ल्ड मॅगझिनच्या अंकाचे अनावरण करण्यात आले. हे एक वार्षिक असे नियतकालिक असून यामध्ये देशभरांतील आघाडीच्या व्यवसायातील व्यवस्थापकीय संचालक, संस्थापक, मालक, सीईओज, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह्ज आणि मॅनेजमेंट लीडर्स सह फ्रॅन्चाईज लीडर्स चा गौरव केला जातो. या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला आणि यावेळी फ्रॅन्चाईजी आणि रिटेल बाजारपेठेतील दिग्गज उपस्थित होते, यामध्ये लॅक्मे लीव्हर चे सीईओ पुष्कराज शेणई, बास्किन रॉबिन्स चे सीईओ मोहित खट्टर, जीसीएमएमएफ, मुंबई चे प्रमुख एस आर नागले अशा अनेक दिग्गजांचा समावेश होता.