डॉ. सुरेश शंकर
नेफ्रॉलॉजिस्ट
भारतात पावसाळा हा प्रचंड उकाड्यापासून दिलासा देणारा स्वागतार्ह ऋतू मानला जातो. पण त्याचसोबत आरोग्याच्या अनेक समस्याही येतात. तापमानातील बदल, वातावरणात आर्द्रता आणि ओलेपणा यांच्यामुळे संसर्गांचा धोका वाढतो.
भारतात सामान्यतः दिसून येणारे संसर्ग हे प्रामुख्याने अन्न आणि पाण्याच्या प्रदूषणामुळे होतात. जसे टायफॉइड, गंभीर गॅस्ट्रोएन्टेरिटिस, हेपटायटिस ए, ई आणि विषाणूजन्य आजार जसे मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू इत्यादी. हे सर्व आजार सुयोग्य वातावरण आणि स्थितीमुळे पावसाळ्याच्या काळात होण्याची शक्यता असते. वयोवृद्ध आणि आधीच असलेल्या आजारांमुळे मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात, कधी-कधी ते तात्पुरत्या स्वरूपाचेही असतात.
१. अन्न आणि पाण्याचा संसर्ग
ओलेपणा, रस्त्यांवर पाणी साचणे आणि गटारे तुंबणे यांच्यामुळे पावसाळ्यातील आर्द्र काळात पाणी प्रदूषित होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अन्न व पाण्याशी संबंधित आजार होऊ शकतात.
प्रभावी संरक्षक उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत:
– हाताची स्वच्छता. साबण आणि पाण्याने हात-पाय धुणे.
-उकळलेले किंवा बाटलीबंद पाणी पिणे
२. फळे
फळांमध्ये सूज प्रतिबंधक उपायांसोबत संभाव्य फायदेही असतात. परंतु पावसाळ्यात बाहेरील कापून तयार असलेली फळे खाणे टाळावे. फळे पाण्यात नीट धुवून त्याची साल काढलेली असावी. प्लम, लिची, डाळिंब अशा फळांमधील तुमच्या प्रदेशांत उपलब्ध असलेल्या फळांचा पर्याय निवडावा.
३. मधुमेहासाठी सावधगिरी
मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांना कोणताही संसर्ग टाळण्यासाठी रक्तशर्करा नियंत्रित ठेवल्याचा फायदा होईल आणि त्रास झाला तरी त्याचे गांभीर्य कमी होईल.
४. शारीरिक व्यायाम
पावसाळ्यामुळे घराबाहेर जाऊन व्यायाम करणे अशक्य किंवा असुरक्षित होते. त्यामुळे चालणे, धावणे किंवा सायकलिंग हे पर्याय अनेक व्यक्तींसाठी उपलब्ध नसतात. त्यासाठी पर्याय म्हणजे घरगुती व्यायाम किंवा योगासने जी लवचिकता, शक्ती वाढवतात आणि आरोग्याची स्थिती सुधारतात.
५. औषधे जवळ ठेवणे
सतत पाऊस पडत असताना रूग्णांना फार्मसीमधून औषधे खरेदी करणे कठीण वाटू शकते. पुरवठ्याची कमतरता असल्यामुळे औषधे वेळेत घेतली जात नाहीत आणि त्यामुळे आजारावरील नियंत्रण कमी होऊन गुंतागूंत वाढू शकते. दीर्घकालीन उपचारांची गरज असलेल्या रूग्णांसाठी पुरेशी औषधे ठेवल्याने अशा आपत्कालीन स्थितीत फायदा होऊ शकतो.
६. वैद्यकीय सेवा सहजसाध्य
पावसाळ्यात वैद्यकीय सेवा मिळणे आव्हानात्मक वाटू शकते परंतु कुणाला ताप, थंडी किंवा पोट बिघडल्याचा त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला वेळेत घेणे उपयुक्त ठरते.