· ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सुरु झालेली ही स्पर्धा १५ डिसेंबर २०२२ पर्यंत चालेल.
· स्पर्धकांना दर दिवशी जिंकता येतील ऍमेझॉन गिफ्ट व्हाउचर्स
· बम्पर बक्षीस विजेत्याला मिळेल लंडन फॅमिली ट्रिपचे महाबक्षीस
· दर दिवशी ८ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत खेळा तंबोला आणि जिंका रोख रकमेची व्हाउचर्स
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने ऑनलाईन गेमर्ससाठी आणि खासकरून कधीतरी अधूनमधून गेम्स खेळणाऱ्यांसाठी एका आकर्षक ऑफरची घोषणा केली आहे. वी ऍपवर वी गेम्स प्लॅटफॉर्मवर ‘एक्स्प्रेस ल्युडो टूर्नामेंट‘ खेळण्यासाठी वी आपल्या ग्राहकांना आमंत्रित करत आहे. या खेळाच्या भाग्यशाली विजेत्याला दोघांसाठी लंडन ट्रिपचे महाबक्षीस जिंकता येणार आहे. ३० नोव्हेंबर २०२२ पासून सुरु झालेली ही स्पर्धा १५ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे.
दररोज एक्स्प्रेस ल्युडो स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या रँकिंगनुसार तिकिटे जिंकता येतील. गेमर्स यामध्ये जितके जास्त खेळत जातील आणि जितकी जास्त तिकिटे टूर्नामेंटमध्ये मिळवत जातील, तितकी त्यांची ट्रिप टू लंडन महाबक्षीस जिंकण्याची शक्यता बळावत जाईल. या बक्षीसामध्ये दोन व्यक्तींसाठी विमानाची तिकिटे आणि निवासाची व्यवस्था यांचा समावेश आहे.
विजेत्यांची नावे आणि फोटो वी सोशल मीडिया पेजेसवर शेअर केले जातील.
गेल्या काही आठवड्यांपासून वी ऍपवर वी गेम्समध्ये तंबोला नाईट्सचे देखील आयोजन केले जात आहे. दर दिवशी रात्री ८ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत दर तीस मिनिटाला एक तंबोला गेम सुरु होतो. वी ने यामध्ये आपल्या युजर्सना वास्तविक तंबोला अनुभव मिळवून दिला आहे. कोणतेही तिकीट शुल्क न भरता वी युजर्स तंबोला खेळण्याचा आनंद घेऊन फुल-हाऊस किंवा एक लाईन किंवा सर्वात जलद ५ साठी कॅश व्हाउचर्स जिंकू शकतील.
वी ऍपवर वी गेम्समध्ये १२०० पेक्षा जास्त अँड्रॉइड आणि एचटीएमएलवर आधारित भरपूर मोबाईल गेम्सचा इमर्सिव्ह गेमिंग अनुभव घेता येतो. ऍक्शन, ऍडव्हेंचर, आर्केड, कॅज्युअल, एज्युकेशन, फन, पझल, रेसिंग, स्पोर्ट्स आणि स्ट्रॅटेजी अशा १० लोकप्रिय शैलींमधील गेम्स याठिकाणी खेळता येतात.