बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रीडा महोत्सवामधील विविध वयोगटाच्या धावण्याच्या शर्यतीत जनार्दन भूकया, महेश कुमार, उदय मेंडन, दुर्गेश देवरा, रजनी शाकया आदी धावपटूंनी प्रथम क्रमांक पटकाविला. ४० वर्षाखालील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विलक्षण चुरस निर्माण होऊन जनार्दन भूकयाने प्रथम, उमेश वाघने द्वितीय तर किरण कुमारने तृतीय क्रमांक मिळविला. कुर्ला येथील डॉन बॉस्को कॉलेज ग्राउंडवर बँक ऑफ बडोदाचे मुंबई विभागीय प्रमुख श्री. मनीष कौरा. उप-प्रमुख श्री. अर्षद खान, नेटवर्क डीजीएम श्री. प्रशांत राऊत, असिस्टंट जनरल मॅनेजर-एचआरएम श्रीमती लिपिका पढी आदी मान्यवरांनी विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्काराने गौरविले.
धावण्याच्या ४० वर्षाखालील महिलांमध्ये दुर्गेश देवराने प्रथम, स्नेहा किल्लेने द्वितीय, नवीनाने तृतीय; ५० वर्षाखालील पुरुषांमध्ये महेश कुमारने प्रथम, धर्मेंद्र शाकयाने द्वितीय, अन्दुल घनीने तृतीय; ४० वर्षावरील महिलांमध्ये रजनी शाकयाने प्रथम, प्रगती तळवेकरने द्वितीय, रिंकी मिश्राने तृतीय; ५० वर्षावरील पुरुषांमध्ये उदय मेंडनने प्रथम, शैबल बॅनर्जीने द्वितीय, संतोष नरहोनाने तृतीय; कर्मचाऱ्यांच्या लहान मुले गटात गौरांशने प्रथम, सेजल सिंगने द्वितीय, रिध्दी बाबूचंद्रनने तृतीय आणि मुलांच्या मोठ्या गटात अर्णव भारतीयाने प्रथम, पार्थ राजने द्वितीय, निहारने तृतीय क्रमांक पटकाविला. क्रीडा महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये बँक ऑफ बडोदाचे मुंबई विभागीय ४०० कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.