महाबळेश्वर प्रतिनिधी :-
अनंत जाधव
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुका हा एक दुर्गम भाग आहे. परंतू महाबळेश्वर तालुक्याला एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावलौकीक मिळाललेले आहे. पर्यटन स्थळामुळे महाबळेश्वर, वाई, पाचगणी या शहराचा विकास केला जातो. परंतू याच तालुक्यातील बहुतांश गावे ही अती दुर्गम राहीली आहेत. महाबळेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या भागात कोयना नदीला पुराची परिस्थीती निर्माण झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत व शेत जमीन देखील वाहून गेली आहेत. वाडा कुंभरोशी पासून तापोळा पर्यंत जाणा-या रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर पारगावच्या जंगलातील रस्यावर गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाळ, माती, झाडे येऊन रस्ता जवळपास दोन ते तीन महीने बंद झाला होता. तद्नंतर जेसीबीच्या सहाय्याने मातीचे ढिगारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे. परंतू ती माती अद्याप तशीच आहे. व त्यामुळे सदर रस्त्यारून प्रवास करणे अगदी धोकादायक झाले आहे. आज जवळपास अतिवृष्टी होऊन एक वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप शासनाला या रस्त्याचे काम करण्यासाठी वेळ मिळाला नाही. तसेच वाडा कुमरोशी ते तापोळा दरम्यानच्या गावामध्ये अनेक ठिकाणी नाल्यांच्या मोऱ्या वाहून तुटून गेल्या आहेत. ज्यात खास करून गोरोशी गावानजीकची मोरी वाहून गेली होती व त्या मोरीमध्ये भर म्हणून दगडी व मातीची भर घालण्यात आली होती ती या वर्षीच्या पावसामध्ये माती वाहून गेली आहे व त्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. मोठ मोठ्या खडयामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. वाहन चालवताना गाडीला जोरजोरात हादरे असतात व त्यामुळे जीवीत हाणी होण्याची दाट शक्यता आहे. त्याच बरोबर शिरवली गावानजीक ताग नदीच्या पुलावरून पाणी वाहून जात आहे. त्यामुळे सदर पुल धोक्याच्या वळणावर आहे. पुढील काळात ताम नदीच्या पुलाला धोका निर्माण झाल्यास जवळपासच्या १५ ते २० गावांचा दळणवळणाचा मार्ग बंद होणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. चतुरबेटचा पुल वाहून गेल्याने या पुढील अनेक गावामध्ये जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यास शासनाने तातपुरता मो-या टाकून साकव पुल बांधला होता त्यामुळे उन्हाळ्यात याच्यावरून जाणे येणे होत होते. परंतू या पावसात तोही साकव पुल वाहून गेला आहे. त्यामुळे चतुरबेटच्या पुढील गावांचा संपर्क तुटला आहे. अशाप्रकारे वाडा कुभरोशी ते तापोळा रस्त्याची चाळण झाली आहे. व त्यामुळे गावात मुंबई महाबळेश्वर येथून येणा-या एसटी वाडा अथवा पार येथे मुक्कामी ठेवाव्या लागतात. त्यामुळे शाळेत जाणा-या मुलांना पायी चालत शाळेत जावे लागते. त्याचबरोबर जिवणावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरीकांना बाजारात जाण्यासाठी खुप हाल अपेष्ठा सोसाव्या लागतात. अतिवृष्टी होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप तातपुरत्या केलेल्या कामांचा कायम स्वरूपी मार्ग निघाला नाही ही खेद जनक बाब आहे. वाडा कुंभरोशी ते तापोळा रस्त्यासाठी अनेक वेळा निधी आला असेल किंवा नसेलही परंतू या भागातील गावांच्या हाल अपेष्ठा मात्र कायमच उदा. चतुरबेटच्या पुलासाठी अतिवृष्टीनंतर निधी मंजूर झाला व त्याचे काम ही करण्यात आले परंतू सार्वजनीक बांधकाम विभागाचे कामच एवढे उत्कृष्ट दर्जाचे होते की या पावसात बाधलेला साकव पुलही वाहून गेला. सांगण्याचे तातपर्य म्हणजे पारगावा नजीक शिवाजी महाराज्यांच्या काळात बांधण्यात आलेला पुल सुतमात्र धक्का न लागता भक्कम उभा आहे. परंतू चतुरबेटचा पुल दर दोन तीन वर्षा नव्याने बांधावा लागतो हे फार हास्यास्पद आहे. त्याच बरोबर झांजवड फाटा ते शिंदेवाडी यादरम्यानचा रस्ता यावर्षी फक्त खडी व माती टाकून ठेवला होता परंतू या पावसात माती व खडी वाहून गेल्यामुळे येणारी एसटी छोटी वाहने ही झांजवड गावच्या मंदीरा जवळच ठेवावी लागतात.
सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना विचारणा केली असता ते म्हणतात उदया
पासूनच काम चालू करतो असे उत्तर मिळते. त्यामुळे झांजवडच काय अशा अनेक गावांमध्ये अशीच अवस्था आहे. या भागात एखाडयावर नैसर्गीक आपत्ती आली अथवा दुर्घटना घडली तर त्याला महाबळेश्वर सारख्या शहरात उपचारासाठी घेऊन जायी पर्यंत जीवीत हाणी झाली नाही तर मिळवीलेच म्हणावे लागेल. या भागातील कामासाठी प्रत्येक बजेटमध्ये निधी उपलब्ध होतो की नाही मला माहीत नाही परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामच एवढे उत्कृष्ट असते की प्रत्येक वेळेस नव्याने करावे लागते. यामुळे बांधकाम विभागाच्या कारभारावर नागरीकांमधून संतप्त प्रक्रीया उमटत आहेत. स्पष्टच सांगायचे तर भागाचे विधाते आमदार, खासदार पदाधिकारी अधिकारी हे आपले सरकार कसे येईल आपल्याला विचारात घेतले जाईल की नाही यात गुंग असतील व मिडीयावाले तर एवढे आमदार खासदार इकडे गेले तिकडे गेले हे दाखवण्यात पुर्ण दिवसच काय तर चार आठ दिवस प्रचार करत असतात त्यामुळे दुर्गम भागात काय चालले आहे त्या भागातील लोकांची अवस्था काय आहे ते कसे दिवस काढतात हे दाखविण्यात त्यांना स्वारस्व वाटत नाही. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या काळात झालेली नुकसानी बघून काही गावांचे पुनर्वसन करण्याची आश्वासने बातम्या देण्यात आल्या परंतू अद्याप त्यावर ठाम निर्णय नाही की अंमलबजावणी नाही. त्यामुळे या तालुक्याला कोणी वाली आहे की नाही हा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. माफ करा मला कोणाला दुखःविण्याचे उदिष्ट नाही व लिहण्यात चुक भूल झाली असेल तर क्षमस्व.