भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी२० क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. टी २० विश्वचषकानंतर सुद्धा सूर्यकुमार यादवची शानदार फलंदाजी न्यूझीलंडविरुद्ध कायम राहिली आणि त्याने २ सामन्यात शतकासह १२४ धावा केल्या. यामुळेच ICC ने जारी केलेल्या क्रमवारीत सूर्यकुमारने ८९५ गुणांसह पहिले स्थान कायम ठेवले आहे. याआधी विराट कोहलीने ८९७ गुण मिळवले होते.
मोहम्मद रिझवान ८३६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. डेव्हॉन कॉनवे ७८८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आणि बाबर आझम ७७८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे. याशिवाय इशान किशनने या क्रमवारीत १० स्थानांनी झेप घेतली असून तो आता ३३ व्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहली सध्या १३ व्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजी क्रमवारीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पहिल्या क्रमांकावर आहे, तर राशिद खान आणि आदिल रशीद अनुक्रमे दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या दहामध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत शाकिब-अल-हसन पहिल्या क्रमांकावर आहे, तर हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सूर्यकुमारची कामगिरी
टी२० विश्वचषकात सूर्यकुमारने २३९ धावा केल्या होत्या आणि नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याने १२४ धावा केल्या. यात एका शतकाचा समावेश होता. सूर्यकुमार यादव ८९० गुणांसह पहिल्या स्थानी आहे.