चार वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या जर्मनीला फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चार वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या जर्मनीला फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. ई-गटातील सामन्यात जपानने जर्मनीचा २-१ ने धुव्वा उडवला आहे. पहिल्या सत्रात पेनल्टी गोल करत जर्मनीने आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या सत्रात जपानने जोरदार पुनरागमन केलं. जपानने अवघ्या आठ मिनिटांत २ गोल करत विश्वविजेत्या जर्मनीचा २-१ ने पराभव केला.
या विश्वचषकातील हा दुसरा सर्वात मोठा अनपेक्षित विजय ठरला आहे. याआधी मंगळवारी सौदी अरेबियाने दोन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या अर्जेंटिनाचा २-१ ने पराभव केला होता. यानंतर आज जपानने चार वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या जर्मनीचा पराभव केला आहे. अगदी सुरुवातीपासून जर्मनीचाच विजय होईल, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, जपानने अभूतपूर्व विजय संपादन केला आहे.