मुंबई : सेन्सी राजेश ठक्कर यांच्या कराटे अकादमीचे ७१ वे कराटे हिवाळी शिबीर २६ ते ३० डिसेंबर दरम्यान खानवेल रिसॉर्ट, सिल्वासा येथे सर्व प्रकारच्या कराटेपटूसाठी आयोजित करण्यात आले आहे. सर्व सहभागी खेळाडूना व्यावहारिक प्रशिक्षणासह अत्याधुनिक कराटे तंत्राद्वारे फिटनेसची माहिती देखील दिली जाणार आहे.
शिबिरामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, भावनगर येथील कराटे विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. कोरोना प्रादुर्भावाचे संकट ओसरल्यामुळे इतर जिल्ह्यातील खेळाडूंनी देखील शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन राजेश ठक्कर यांनी केले आहे. शिबिरामध्ये किहोन (मूलभूत), काटा (फॉर्म), बुंकई आदी प्रशिक्षणाच्या शास्त्रीय पैलूंवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. इप्पोन कुमिते (एक पाऊल झगडा), माकीवारा (बॅगवर्क), शिया कुमिते (स्पोर्ट्स कराटे), पूल प्रशिक्षण, रंग आणि ब्लॅक बेल्ट परीक्षा आदींचा शिबिरात समावेश असेल. सेन्सी राजेश ठक्कर यांना शिबिरात सेन्सी जयेश सोमय्या, सेन्सी गॉस्पी कपाडिया व सेन्सी बहादूर रावल यांचे सहकार्य लाभणार आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कराटे खेळाडूंनी प्रवेशासाठी अथवा अधिक माहितीसाठी राजेश ठक्कर (९८२०१ ५७७३८) यांच्याकडे २५ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा.