पुणे, नोव्हेंबर १७, २०२२: भारतीय रिझर्व बँकेच्या (आरबीआय) राष्ट्रव्यापी गहन जागरूकता अभियानाचा भाग म्हणून, भारतातील सर्वांत मोठी व विविधीकृत एनबीएफसी तसेच बजाज फिनसर्व्ह लिमिटेडची कर्जवितरण कंपनी, बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल), महाराष्ट्र, हरयाणा व पंजाब या राज्यांमध्ये जनजागृती व व्याप्ती कार्यक्रमांची मालिका संपूर्ण महिनाभर आयोजित करत आहे. जागरूकता सत्रे वेगवेगळ्या शाळा व कॉलेजांमध्ये, उत्पादन कारखान्यांमध्ये तसेच वाहन संघटनांच्या आवारांमध्ये घेतली जाणार आहेत.
या मालिकेतील पहिली कार्यशाळा १५ नोव्हेंबर २०२२ रोजी हरयाणातील सोनिपत येथील गव्हर्न्मेंट गर्ल्स सेकंडरी स्कूलमध्ये घेण्यात आली. या कार्यक्रमात हरयाणा पोलीसमधील निवृत्ती जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. जगदीश चंदेर यांनी एक विशेष सत्र घेतले. यात त्यांनी आर्थिक गुन्ह्यांच्या पद्धती (मोडस ऑपरेण्डी) आणि सायबर गुन्ह्यांपासून आपण स्वत:ला सुरक्षित कसे ठेवू शकतो, यावर प्रकाश टाकला. या कार्यशाळेत बजाज फायनान्स लिमिटेडचे काही वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. त्यांनी सुरक्षित बँकिंग पद्धतींबद्दल सर्वांना सांगितले आणि सायबर गुन्हेगारांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या. सोनिपत येथील गव्हर्न्मेंट गर्ल्स सीनियर सेकंडरी स्कूलमधील ११वी व १२वी इयत्तांमधील ७५हून अधिक विद्यार्थिनी, तसेच शाळेचे प्राचार्य, शिक्षक व अन्य कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
बजाज फायनान्स लिमिटेडतर्फे राष्ट्रव्यापी गहन जागरूकता अभियानांतर्गत हरयाणातील सोनिपत येथील गव्हर्न्मेंट गर्ल्स सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये १५ नोव्हेंबर २०२२ रोजी विद्यार्थिनी, शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.
सत्रात सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थिनी.
ग्राहकहिताच्या संरक्षणासाठी असलेली विद्यमान नियमने, पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा, सुरक्षित बँकिंग पद्धती आदींबाबत ग्राहकांचा जागरूकता स्तर उंचावण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व बँक अनेकविध उपक्रम राबवत आहे. हेच प्रयत्न अधिक तीव्र करण्यासाठी आरबीआयने अन्य बँका व एनबीएफसींच्या सहयोगाने १ ते ३० नोव्हेंबर २०२२ या महिनाभराच्या काळात राष्ट्रव्यापी गहन जागरूकता अभियान सुरू केले आहे. अन्य बँका व एनबीएफसींच्या व्याप्तीचा व टचपॉइंट्सचा लाभ घेऊन दुर्गम, फारशी पोहोच नसलेल्या व वेगळ्या पडलेल्या भौगोलिक प्रदेशांपर्यंत व लोकांपर्यंत पोहोचण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे. यांमध्ये देशातील दूरवरील व दुर्गम भागांचा समावेश होतो.
महिनाभर चालणाऱ्या या जागरूकता कार्यक्रमांचा भाग म्हणून, बजाज फायनान्स अनेक कार्यशाळांचे आयोजन करणार आहे. वाहन संघटनांचे सदस्य, कारखान्यांतील कामगार तसेच विविध शाळा व कॉलेजांमधील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारीवर्ग अशा लक्ष्यगटांतील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळा घेतल्या जातील. या कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
अनुक्रमांक | तारीख | शहर | कार्यक्रमस्थळ | वेळ |
१ | १५-११-२०२२ | सोनिपत, हरयाणा | गव्हर्न्मेंट गर्ल्स सीनियर सेकंडरी स्कूल, सोनिपत | सकाळी ११:०० – दुपारी १२:३० |
२ | २२-११-२०२२ | मोहाली, पंजाब | रयत-बाहरा विद्यापीठ, मोहाली | सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० |
३ | २३-११-२०२२ | पुणे, महाराष्ट्र | बजाज ऑटो लिमिटेड, चाकण कारखाना, पुणे | सकाळी १०:३० ते दुपारी ०३:३० |
४ | २५-११-२०२२ | मुंबई, महाराष्ट्र | सेलिब्रेशन बँक्वेट, पहिला मजला, सेंट्रियम शॉपिंग मॉल, लोखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई – १०१ | दुपारी ०१:०० ते ०३:३० |
बजाज फायनान्स आपले डिजिटल व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, शाखांचे जाळे व अन्य इन्फोटेनमेंट माध्यमांद्वारे अखेरच्या ग्राहकांपर्यंत पोहोचून व त्यांना वित्तीय उत्पादने व सेवा अधिक चांगल्या रितीने समजून घेण्यास मदत करून जागरूकता अभियान राबवत आहे. ग्राहकांनी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन धोक्यांपासून दूर कसे राहावे यावरही यात भर दिला जात आहे. कंपनीचे ‘सावधान रहे. सेफ रहे.’ अभियान म्हणजे ग्राहकांना ऑनलाइन आर्थिक फसवणूकीपासून सुरक्षित राहण्यात मदत करणारा सक्रिय व प्रतिबंधात्मक उपक्रम होता.
‘हर टाइम ईएमआय ऑन टाइम’ हे कंपनीचे वित्तीय शिक्षण अभियान जागरूकतेचा प्रसार करण्यात, कर्जदारांच्या चांगल्या सवयी समजून घेण्यात व अंगिकारण्यात मदत करते. त्याचवेळी कर्जाच्या वक्तशीर परतफेडीचे लाभ, ईएमआयची मुलभूत तत्त्वे व मजबूत आर्थिक भवितव्य समजून घेण्यात ग्राहकांना व जनतेला मदत करण्याचे उद्दिष्ट या अभियानापुढे आहे.
या उपक्रमांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लिंक्सवर क्लिक करा:
१.https://www.bajajfinserv.in/fraud-awareness