मुंबई, : प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे अथर्व फाऊंडेशन आणि ऑल प्ले प्रॉडक्शनतर्फे “ऑल प्ले अ कार्निव्हल ऑफ जॉय” आयोजित करण्यात आला
यावेळी बोरिवलीतील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नाटक, कविता आणि स्किट्स मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री गोपाळ शेट्टी, खासदार उत्तर मुंबई, सतींदर एस. आहुजा, माननीय काउंसिल , जॉर्जियाचे काउंसिल , अरुण नलावडे, प्रसिद्ध चित्रपट आणि थ्रेटर व्यक्तिमत्व, वर्षा राणे, ट्रस्टी अथर्व फाउंडेशन आणि सुनील राणे, आमदार बोरिवली उपस्थित होते.
ऑल प्ले कार्निव्हलमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी बोरिवलीतील विविध शाळांमधील मुलांनी केलेली विविध स्किट्स, बॉलीवूड गाणी आणि कविता सादरीकरणाला दाद दिली. शिवाजी महाराजांच्या जीवनकथेवर आधारित नाट्यमय सादरीकरण आणि श्रीमती वर्षा राणे दिग्दर्शित द्वारका प्रसाद माहेश्वरी लिखित वीर तुम बढ़े चलो या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.
यावेळी बोलताना सुनील राणे म्हणाले की, अथर्व फाऊंडेशनने आयोजित केलेला ऑल प्ले कार्निव्हल हा बोरिवलीतील स्थानिक लोकांसाठी आजूबाजूच्या मुलांसमोर त्यांचे कलागुण दाखविण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. मुलांनी सादर केलेल्या विविध सादरीकरणाने पाहुणे आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.