मुंबई, 15 नोव्हेंबर 2022 : अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स लिमिटेड (एबीडी – ABD), भारतातील सर्वात मोठी स्पिरिट्स कंपनी, ने आपल्या अलीकडील केलेल्या उत्पादनांच्या लाँच ना अनुसरून, आज आपली प्रीमियम ऑफर X&O Barrel Premium Whisky लॉन्च केली. हा लाँच एबीडी साठी अद्वितीय मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म, एबीडी ABD मेटाबार वर आहे. यानंतर त्याचे फिजिकल मार्केट लॉन्च या आठवड्यात मिलिनिअल सिटी, गुडगाव येथे केले जाईल आणि त्यानंतर ब्रँड राष्ट्रीय पातळीवर लाँच केला जाईल.
X&O हे अमेरिकन बरबन बॅरल्स आणि उत्कृष्ट भारतीय ग्रेन स्पिरिटमध्ये परिपक्व झालेल्या सर्वोत्तम स्कॉच माल्टचे प्रीमियम मिश्रण आहे. ‘X&O’ हे नाव X (चुंबन) आणि O (आलिंगन) ह्या मिलिनिअल्स च्या शॉर्ट कडेस वरून आले आहे ज्यामध्ये जवळीक, प्रेमळपणा, उत्कटता आणि मैत्री यासारख्या घटकांचा समावेश आहे. या व्हिस्कीमध्ये घनिष्ठ बंध आणि गहाण संबंधांची भावना दिसून येते.
श्री. शेखर रामामूर्ती, कार्यकारी उपाध्यक्ष, एबीडी लॉन्च प्रसंगी बोलताना म्हणाले, “X&O Barrel Premium Whisky चे लाँच हे एबीडी च्या ग्राहकांना उच्च आणि प्रीमियम दर्जाची उत्पादने आणि समकालीन ब्रँड्स ऑफर करण्याच्या प्रवासातील एक पाऊल आहे.”
श्री. बिक्रम बसू, उपाध्यक्ष, स्ट्रॅटेजी, मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट, एबीडी, म्हणाले, “X&O बरोबर जवळ या. आमच्याकडे आनंद घेण्यासाठी, सामायिक करण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी एक मिश्रण आहे. संप्रेषण पॅकेजिंग सोन्याच्या ठळक वैशिष्ट्यांसह काळ्या आणि पांढर्या रंगांना प्रतिबिंबित करेल जे जिव्हाळ्याचे आणि कामुक असेल.”
सोहिनी पानी, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक – रिव्हर लॉन्च प्रसंगी बोलताना म्हणाल्या, “संवादाची कल्पना आणि व्हिज्युअल स्पेस X&O या नावापासूनच प्रेरित आहे. जेव्हा उत्पादन चुंबन आणि आलिंगना बद्दल असते, तेव्हा प्रियजनांमधील जिव्हाळ्याचे क्षण साजरे करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. ‘गेट क्लोजर’ हा ब्रँड प्रस्ताव लोकांना त्यांच्या जीवनात अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यास उद्युक्त करतो.”
X&O Barrel Premium Whisky ७५० मि.ली., ३७५ मि.ली. आणि १८० मि.ली. या तीन पॅक आकारात उपलब्ध आहे.
Social Media & Websites
- ABD MetaBar: www.abdmetabar.com
- ABD Twitter: @ABDL_India
- Brand Webpage: https://www.abdindia.com/
- Instagram: https://instagram.com/xobarrelwhisky
- Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100086269197126
- YouTube: https://www.youtube.com/@xobarrel
- Hashtags: #XandO #XandOBarrelWhisky #GetCloser
अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स (एबीडी – ABD) ही सर्वात मोठी भारतीय मालकीची स्पिरिट्स कंपनी आहे आणि देशातील तिसरी सर्वात मोठी आयएमएफएल कंपनी आहे. त्याचा फ्लॅगशिप ब्रँड, ऑफिसर्स चॉईस हा जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्हिस्कींपैकी एक आहे, ज्याचा बाजार हिस्सा ३७% आहे आणि तो भारताबाहेर निर्यात होणाऱ्या सर्वात मोठ्या स्पिरीट्स ब्रँडपैकी एक आहे. स्टर्लिंग रिझर्व्ह व्हिस्की, या त्यांच्या प्रीमियम उत्पादनाने विक्रमी यश मिळवल आहे.ए
बीडी ही एक मल्टी-ब्रँड कंपनी आहे जी २२ पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जाणारी व्हिस्की, ब्रँडी, रम आणि वोडका श्रेणींमध्ये उपस्थिती असलेले अल्कोहोलिक पेये तयार करते आणि पुरवते. आज, त्याच्या नेटवर्कमध्ये ९ मालकीचे बॉटलिंग युनिट, १ डिस्टिलिंग युनिट आणि २० बिगर मालकीचे उत्पादन युनिट समाविष्ट आहेत.