होल बॉडी डिजिटल ट्विन™ तंत्रज्ञान टाइप २ मधुमेहाने पीडित व्यक्तींना चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करण्यासाठी वैयक्तिक दृष्टिकोन सक्षम करते
मुंबई-१४ नोव्हेंबर २०२२: ट्विन हेल्थ या सेन्सर्स, मशिन लर्निंग आणि वैद्यकीय विज्ञानाचा समावेश असलेल्या अचूक आरोग्य व्यासपीठाने नुकतेच त्यांचे यशस्वी तंत्रज्ञान होल बॉडी डिजिटल ट्विन™ची घोषणा केली. हे तंत्रज्ञान पेटंट केले गेले आहे आणि यादृच्छिक क्लिनिकल चाचणीच्या त्याच्या वैज्ञानिक परिणामांना टाइप २ मधुमेह व इतर क्रॉनिक चयापचय आजार जसे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब व नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डीसीज (एनएएफएलडी) यांच्या निवारणासाठी अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए), अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी (एएसीई), इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (आयडीएफ), अॅडवान्स्ड टेक्नोलॉजीज अॅण्ड ट्रीटमेंट्स फॉर डायबिटीज (एटीटीडी) इत्यादींकडून आयोजित करण्यात आलेल्या वैज्ञानिक सत्रांमधील मान्यतेद्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. टाइप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी कमीत-कमी तीन महिने मधुमेहावरील औषधे न घेता सामान्य रक्तातील ग्लुकोज (रक्तातील साखर) पातळी टिकवून ठेवणे अशा प्रकारे निवारण उपचार दर्शवण्यात आला आहे. ट्विन हेल्थच्या एआय-संचालित संशोधनात टाइप २ मधुमेहासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक ज्ञात निवारण दर नोंदवला गेला आहे.
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनला सबमिट करण्यात आलेली ट्विन हेल्थ स्टडी ‘रिमिशन ऑफ टाइप २ डायबिटीज विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, अॅण्ड होल-बॉडी डिजिटल ट्विन: इनिशिएल सिक्स-मंथ्स रिझल्ट्स ऑफ रॅण्डमाइज्ड कंट्रोल ट्रायल’च्या निष्पत्तींना मधुमेहाने पीडित व्यक्तींसाठी संशोधन व उपचार वाढवण्यामधील त्याच्या सर्वोत्तमतेसाठी, तसेच वैद्यकीय व सामान्य न्यूज मीडियाला आवाहन करण्याच्या त्याच्या क्षमतेसाठी अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या ८२व्या सायण्टिफिक सेशन्ससाठी अधिकृत प्रेस प्रोग्राममध्ये समाविष्ट होण्यास निवडण्यात आले. एडीएकडे एकूण ३ कागदपत्रे सबमिट करण्यात आली आणि तिन्ही कागदपत्रांची निवड करण्यात आली. प्रेस प्रोग्रामव्यतिरिक्त इतर २ कागदपत्रे – ‘मेटाबोलिक बेनीफिट्स बीयॉण्ड ग्लायसेमिक कंट्रोल विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, अॅण्ड होल-बॉडी डिजिटल ट्विन: इनिशिएल सिक्स-मंथ्स रिझल्ट्स ऑफ रॅण्डमाइज्ड कंट्रोल ट्रायल’ आणि ‘नॉर्मलायझेशन ऑफ ग्लायसेमिक अॅण्ड एक्स्ट्राग्लायसेमिक पॅरामीटर्स विथ टी२डीएम रिमिशन – इनसाइट्स फ्रॉम आरसीटी एनेबल्ड बाय होल-बॉडी डिजिटल ट्विन टेक्नोलॉजी’ सादर करण्यात आले.
ट्विन हेल्थच्या वैद्यकीय संशोधन टीमने ट्विन प्रीशीसन ट्रिटमेंट टेक्नोलॉजीचा (टीपीटी) परिणाम विरूद्ध ९० दिवसांच्या कालावधीमध्ये ए१सी व टाइप २ मधुमेह रिमिशनमधील बदल निर्धारित करण्यासाठी रॅण्डमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल (आरसीटी) केली. टीपीटी हस्तक्षेपाने टीपीटी अॅप व प्रशिक्षकांच्या माध्यमातून अचूक पोषण, झोप, कृती व श्वासोच्छवासासंदर्भात मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने बहु-आयामी डेटा समाविष्ट करण्यासाठी ए.आय. व इंटरनेट ऑफ थिंग्जसह होल-बॉडी डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्मचा लाभ घेतला. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या डायबिटीज जर्नलमध्ये प्रारंभिक आरसीटी डेटा अद्वितीय आरोग्य निष्पत्तींसह सादर व प्रकाशित करण्यात आला. रूग्णांमध्ये सरासरी एचबीए१सी कपात ३.१ (सरासरी बेसलाइन ८.७) होती, तर ९० टक्क्यांहून अधिक रूग्णांनी टाइप २ मधुमेह रिव्हर्सल (एचबीए१सी ६.५ पेक्षा कमी) संपादित केले आणि ९२ टक्के रूग्णांनी इन्सुलिनसह सर्व मधुमेह औषधोपचार बंद केले. तसेच रूग्णांचे सरासरी वजन ९.१ किग्रॅने (२० एलबीएस) कमी झाले. बेसलाइन असामान्य यकृत कार्य असलेल्या रूग्णांमध्ये (क्लिनिकल लॅब मूल्यांवरील सुधारित एएलटीद्वारे परिभाषित) सरासरी एएलटी कपात २४ युनिट्स/लिटर होती.
आरसीटीच्या वैज्ञानिक निष्पत्ती व व्यावसायिक परिणाम ३१ पीअर-पुनरावलोकन केलेल्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्स, कॉन्फरन्स पेपर्स आणि अॅब्स्ट्रॅक्ट्समध्ये प्रकाशित केले गेले आहेत. अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए)ची जून २०२२ मध्ये न्यू ऑर्लीन्स, एलए येथे आयोजित मधुमेह संशोधन, प्रतिबंध व काळजी यावर लक्ष केंद्रित करणारी जगातील सर्वात मोठी वैज्ञानिक बैठक ८२व्या वैज्ञानिक सत्रात हे निष्कर्ष लेट-ब्रेकिंग पोस्टर सत्र म्हणून सादर केले गेले. याव्यतिरिक्त, युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबिटीजच्या ५८व्या वार्षिक बैठकीत सादर केलेल्या आणखी एका अहवालात मायक्रोअल्ब्युमिनूरिया, रक्तदाब कमी होणे आणि टी२डीएमचे रिमिशन: रिझल्ट्स ऑफ सिक्स मंथ आरसीसीटी विथ होल-बॉडी डिजिटल ट्विन टेक्नोलॉजी (Results of Six Month RCCT with Whole-Body Digital Twin Technology) यांच्यातील परस्परसंबंध दिसून आला. दीर्घकाळापर्यंत औषधोपचाराशिवाय टाइप २ मधुमेहाचे निवारण होण्यास मदत करण्यासाठी होल बॉडी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाची क्षमता या अभ्यासातून दिसून आली.
प्रत्येक व्यक्तीची चयापचय क्रिया वेगळी असल्याने टाइप २ मधुमेहाचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असू शकते, ज्यामुळे वैयक्तिकरित्या उपचार सानुकूल करणे कठीण होते. जुलै २०२१ मध्ये ट्विन हेल्थने टाइप २ डायबिटीजचे निवारण करण्यापासून ते क्रॉनिक चयापचय आजारांचे निवारण करण्यासाठी आणि एकूण चयापचय आरोग्य सुधारण्यासाठी होल बॉडी डिजिटल ट्विन™चा विस्तार केला. आरसीटीने दाखवून दिले की, होल बॉडी डिजिटल ट्विन™ व्यक्तींना मधुमेह, पूर्व-मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे निवारण व प्रतिबंधित करण्यासाठी, तसेच उच्च रक्तदाब, एनएएफएलडी इत्यादीसारख्या आजारांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यास सक्षम करू शकते.
या लक्षणीय उपलब्धीबाबत बोलताना ट्विन हेल्थचे वैद्यकीय संचालक डॉ. परामेश शमन्ना म्हणाले, “आम्हाला जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने टाइप २ मधुमेह निवारणासाठी होल बॉडी डिजिटल ट्विन® सक्षम अचूक उपचारांना मान्यता दिली आहे. यामुळे आम्हाला आमच्या कंपनीच्या क्रॉनिक आजारांवर उपचार करण्याच्या आणि व्यक्तींना आरोग्यदायी व आनंदी जीवन जगण्यास मदत करण्याच्या ध्येयाच्या एक पाऊल पुढे नेले आहे. आमचे तंत्रज्ञान होल बॉडी डिजिटल ट्विन™ पेटंट केलेले आहे. फक्त यूएसमध्येच नाही तर भारतातही तीन वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू झाल्यापासून जवळपास १३,००० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. ट्विन हेल्थमध्ये आमचे प्रगत वैद्यकीय विज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या संयोजनाच्या माध्यमातून चयापचय आजारांचे मूळ कारण शोधण्याचे ध्येय आहे.”
“आमच्या निष्पत्ती होल बॉडी डिजिटल ट्विन™ तंत्रज्ञानाची क्षमता दाखवतात, ज्यामुळे टाइप २ मधुमेहाचे पारंपारिक, औषध-चालित व्यवस्थापन बदलून औषधोपचार मुक्त जीवनासह टाइप २ मधुमेहाचे निवारण होते. या उपक्रमांचा रुग्णांच्या समाधानावर, जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. केअरचा एकूण खर्च माफक आहे आणि जागतिक स्तरावर चयापचय आजाराने ग्रस्त असलेल्या व्यापक व्यक्तींप्रती महत्त्वपूर्ण कटिबद्धता दाखवली आहे. आम्हाला या यशाचा अभिमान आहे, ज्यामुळे आम्हाला भविष्यात रूग्णांमध्ये चयापचय आजार नियंत्रित करण्यासाठी अधिक प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रोत्साहन मिळेल,” असे ट्विन हेल्थचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक जोशी म्हणाले.
याबाबत ट्विन हेल्थचे सह-संस्थापक, उपाध्यक्ष (संशोधन) व मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत) डॉ. मलुक मोहम्मद म्हणाले, ”टाइप २ मधुमेहामुळे होणारे चयापचय आजार उपचार न केले गेले तर ते घातक ठरू शकतात. होल बॉडी डिजिटल ट्विन™ने आधीच अत्यंत वैयक्तिकृत उपचार सुविधा देऊन रुग्णांच्या शरीराद्वारे प्रदान केलेल्या रीअल-टाइम चयापचय अभिप्रायावर डॉक्टर आणि रुग्णांना सक्षम केले आहे. परिणामी, ट्विन सदस्यांनी टिकाव धरण्यास योग्य आहार, तीव्र व्यायाम दिनचर्या आणि दुष्परिणामांसह अनेक औषधे यापासून स्वातंत्र्याचा अनुभव घेतल्याची नोंद केली आहे. अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए)च्या पाठिंब्यासह या क्रांतिकारी तंत्रज्ञान-सक्षम अचूक उपचाराला रूग्ण आणि आरोग्य सेवा प्रदात्यांमध्ये स्वीकृती प्राप्त होईल.”
ट्विनने यूएसमध्ये व जागतिक स्तरावर आपली सेवा वाढवल्यामुळे वर्षानुवर्षे क्रॉनिक चयापचय आजारांसह जगलेल्या व्यक्तींसाठी जीवनाचा दर्जा बदलण्याची आणि सुधारण्याची संधी आहे.