इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील पहिला दुहेरी विश्वविजेता ठरला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. तर वनडे विश्वचषकाचे विजेतेपदही इंग्लंडकडे आहे. प्रथमच, एका संघाने एकाच वेळी वनडे आणि टी-20 या दोन्हीचे विश्वविजेतेपद पटकावले आहे.
या पाच प्लेयर्सनी चेंडू आणि बॅटची कमाल दाखवून दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला.
2 – इंग्लंडच्या विजयाचा दुसरा हिरो कॅप्टन जोस बटलर आहे. त्याने टीमसाठी सर्वाधिक धावा केल्या. बटलरने 45 च्या सरासरीने 225 धावा केल्या. बटलरचा स्ट्राइक रेट 144 पेक्षा जास्त होता. कॅप्टनशिप करताना त्याने कुशल नेतृत्व केलं.
3 – एलेक्स हेल्स टीमच्या विजयाचा तिसरा हिरो आहे. त्याने या वर्ल्ड कपमध्ये 42 पेक्षा जास्त सरासरीने 212 धावा फटकावल्या. त्याचा स्ट्राइक रेट 147 पेक्षा पण जास्त होता.
4 – बेन स्टोक्स या विजयाचा चौथा हिरो आहे. त्याने संपूर्ण टी 20 वर्ल्ड कपमध्ये सरासरी प्रदर्शन केलं. पण फायनलमध्ये त्याने टॉप खेळ दाखवला. स्टोक्सने 36 पेक्षा जास्त सरासरीने 110 धावा केल्या. त्याने 6 विकेट काढले.
अंतिम सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाला 20 षटकात 8 विकेट गमावून केवळ 137 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने नाबाद सर्वाधिक 52 धावा केल्या. पाकिस्तानकडून हारिस राऊफने 2 बळी घेतले.
इंग्लंडच्या डावातील क्षणचित्रे
पाकिस्तानच्या डावातील क्षणचित्रे
- शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्या षटकातच 1 धाव घेतल्यानंतर एलेक्स हेल्सला क्लीन बोल्ड केले.
- त्याचवेळी फिल सॉल्टने 9 चेंडूत 10 धावा केल्या आणि हारिस रौफच्या चेंडूवर तो बाद झाला.
- जोस बटलरला चांगली सुरुवात झाली, पण तो १७ चेंडूत २६ धावा करून बाद झाला.
- हॅरी ब्रूकला शादाब खानने 20 चेंडूत 23 धावा करून बाद केले, त्याचा झेल शाहीन आफ्रिदीने घेतला.
- चौथ्या षटकात पाकिस्तानकडून पहिला चौकार आला. मोहम्मद रिझवानने ख्रिस वोक्सच्या चेंडूवर षटकार ठोकला.
- यानंतर 15 धावा केल्यानंतर तो सॅम करनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. मोहम्मद हारिसलाही अंतिम सामन्यात काही विशेष करता आले नाही आणि तो 12 चेंडूत 8 धावा करून बाद झाला.
- बाबर आझम 28 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. त्याला 12व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आदिल रशीदने बाद केला. राशिदने हे ओव्हर मेडन टाकले. आधीच्या षटकात लिव्हिंगस्टोनने 16 धावा दिल्या होत्या.