कोणत्याही चीरा किंवा विजेच्या झटक्यांशिवाय इंट्रायूटरिन विकृतींवर उपचार करण्यासाठी डिझाइन केलेले नेक्स्ट-जनरेशन डिवाईस
मुंबई, नोव्हेंबर 2022: मेडट्रॉनिक पीएलसी (NYSE:MDT)ची पूर्णत: मालकीची उपकंपनी इंडिया मेडट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेडने आज इंट्रा यूटरिन अॅब्नॉर्मलिटीज (आययूए)च्या सुरक्षित व प्रभावी उपचारासाठी वापरण्यात येणारी मेकॅनिकल हिस्टरोस्कोपिक टिशू रिमूव्हल सिस्टिम ट्रूक्लीअर™ सिस्टिमच्या लॉन्चची घोषणा केली. सामान्यत: आढळून येणाऱ्या आययूएमध्ये फायब्रॉइड्स, पॉलीप्स, गर्भधारणेची राखून ठेवलेली उत्पादने, अधेशन्स, मालिग्नान्सिस किंवा हायपरप्लासिया यांचा समावेश आहे.
आययूएच्या लक्षणांपैकी एक म्हणजे अॅब्नॉर्मल यूटरिन ब्लीडिंग (एयूबी). एयूबी म्हणजे सामान्य मासिक पाळीच्या चक्राशी संबंधित नसलेल्या योनिमार्गातील रक्तस्त्राव, जो मासिक पाळीच्या दरम्यान किंवा असामान्यपणे अधिक प्रमाणातील मासिक पाळीच्या दरम्यान थोड्या प्रमाणात स्पॉटिंगच्या स्वरूपात होऊ शकतो. रजोनिवृत्ती दरम्यान ९ ते १४ टक्के महिलांमध्ये एयूबी आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक देशात त्याचे प्रमाण वेगवेगळे असते. भारतात, एयूबीचा प्रसार सुमारे १७.९ टक्के1 आहे. सावधपणे प्रतीक्षा करणे आणि गर्भाशय काढून टाकणे (ज्याला हिस्टरेक्टॉमी म्हणतात) हे एयूबीचे दोन सामान्य उपचार आहेत. या दोन उपचारांव्यतिरिक्त आणखी एक उपचार म्हणजे हिस्टेरोस्कोपी. हा किमान इन्वेसिव्ह उपचार सर्जन्सना प्रत्यक्ष गर्भाशय तपासण्याची सुविधा देतो, ज्यामुळे त्यांना एयूबी फायब्रॉइड्स, पॉलीप्स, गर्भधारणेची राखून ठेवलेली उत्पादने किंवा इंट्रायूटरिन अधेशन्सशी संबंधित आहे की नाही याचे निदान करता येते2. यासाठी चीरा किंवा विजेच्या झटक्यांची गरज नाही आणि यामधून रूग्ण लवकर बरा होतो.
‘’ट्रूक्लीअर सिस्टिम ही आमच्या जीवायएन व विमेन्स हेल्थ पोर्टफोलिओमधील नवीन भर आहे आणि यासारख्या नवोन्मेष्कारांना सादर करत आम्ही भारतातील महिलांच्या आरोग्यसेवेसाठी निवड, नियंत्रण व आत्मविश्वास देत आहोत. इंट्रा यूटरिन पॅथॉलॉजीजवर उपचार करण्याचा कमी इन्वेसिव्ह आणि प्रभावी मार्ग सुलभ करण्यासाठी ही सिस्टिम निर्माण करण्यात आली आहे, ज्यामुळे रूग्णांचे अवयव कायम राहण्याची आणि ते लवकर नित्यक्रमावर परतण्याची खात्री मिळते. यामधील अचूक व सुधारित दृश्यमानता स्त्रीरोगतज्ञांना आवश्यक आरामदायी सुविधा देतात आणि जटिलता टाळण्यामध्ये, सर्वोत्तम रूग्ण निष्पत्तींमध्ये मदत करतात,’’ असे मेडट्रॉनिक इंडियाच्या सर्जिकल, पेशंट मॉनिटरिंग, रिस्पायरेटरी इंटरवेन्शन्स अॅण्ड ईएनटीचे संचालक अभिषेक भार्गव म्हणाले.
ट्रूक्लीअर™ हे नेक्स्ट-जनरेशन डिवाईस आहे, जे शस्त्रक्रियेदरम्यान प्रॅक्टिशनर्सना सुस्पष्ट ऑपरेटिव्ह जागा व रूग्णांना सौम्य मेकॅनिकल रिसेक्शन देते, ज्यामुळे हिस्टरोस्कोपी उत्तमरित्या होण्यास मदत होते. उच्च वारंवारतेच्या इलेक्ट्रिक करंटचा वापर केल्या जाणाऱ्या इतर इंट्रायूटरिन अॅब्नॉर्मलिटी उपचार पर्यायांच्या तुलनेत ट्रूक्लीअर™ सिस्टिम इंट्रायूटरिन टिशू काढून टाकण्यासाठी सोप्या मेकॅनिकल दृष्टिकोनाचा वापर करते. ज्यामुळे औष्णिक ऊर्जा किंवा विद्युत ऊर्जेपासून गर्भाशयाच्या अस्तरावर कोणतेही डाग न येण्याची खात्री मिळते आणि भविष्यासाठी गर्भाशयाचे संरक्षण करण्याची अधिक आशा मिळते.