नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार (Share Market) या महिन्यात जास्त व्यस्त असेल. पुढील आठवड्यात चार कंपन्यांचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) येत आहेत. यामध्ये मेदांता ब्रँड ग्लोबल हेल्थ लिमिटेड आणि माइक्रो फायनान्स लोन प्रोव्हायडर फ्यूजन माईक्रो फायनान्स लिमिटेड यांच्यासह एकूण चार कंपन्यांचा (Companies) समावेश आहे.
तर बाजारात नोव्हेंबर महिन्यात यूनिपोर्टस इंडिया आणि फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स यांचे आयपीओ येण्याची ही दाट शक्यता आहे. याविषयीची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याविषयी अद्याप ठोस माहिती आलेली नाही.
डीसीएक्सचा आयपीओ 31 ऑक्टोबर रोजी उघडेल आणि 2 नोव्हेंबर रोजी बंद होईल. फ्यूजन मायक्रो फायनान्सचा आयपीओ 2 नोव्हेंबर रोजी उघडेल तर 4 नोव्हेंबर रोजी बंद होईल. ग्लोबल हेल्थ आणि बीकाजी फूड्स याचा आयपीओ 3 नोव्हेंबर रोजी उघडेल तर 7 नोव्हेंबर रोजी बंद होईल.
यावर्षी, 2022 मध्ये आतापर्यंत एकूण 22 कंपन्या त्यांचा आयपीओ घेऊन आल्या आहेत. या कंपन्यांनी शेअर बाजारातील विक्रीतून आतापर्यंत 44,000 रुपये जमा केले आहेत. गेल्या वर्षी 2021 एकूण 63 कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले होते. त्यामाध्यमातून 1.19 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.
आता तुम्ही म्हणाल आयपीओ बाजारात दाखल होत आहेत. पण बाजाराची स्थिती खरंच कशी आहे. तर जिओजीत फायनान्शियल सर्व्हिसेजचे प्रमुख विनोद नायर यांनी याचे उत्तर दिले आहेत. बाजाराची स्थिती कशी आहे याची माहिती त्यांनी दिली.
नायर यांच्या मते, बाजारात यंदा खूप चढ-उतार झाले. त्यामुळे हे वर्ष आयपीओ बाजारासाठी कमजोर राहिले. तर पुढेही परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळेच आकर्षक किंमतीत गुंतवणूकदारांना आयपीओत गुंतवणुकीची संधी मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
फ्यूजन मायक्रो फायनान्सचा आयपीओ 2 नोव्हेंबरला होणार खुला, अधिक जाणून घेऊयात…
मुंबई : फ्यूजन मायक्रो फायनान्स लिमिटेडचा आयपीओ (Fusion Micro Finance Ltd IPO) पुढील आठवड्यात 2 नोव्हेंबरला खुला होईल आणि 4 नोव्हेंबर रोजी बंद होईल. या आयपीओअंतर्गत कंपनी 600 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे.
त्याच वेळी, त्याचे विद्यमान प्रमोटर्स आणि शेअरहोल्डर्सकडून 1.37 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जातील. देवेश सचदेव सुमारे 6.5 लाख शेअर्स विकणार आहेत, तर मिनी सचदेव सुमारे 1 लाख शेअर्स विकणार आहेत.
या आयपीओसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सीएलएसए इंडिया, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि जेएस फायनांशियल यांची लीड मॅनेजर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी, हा आयपीओ एक दिवस आधी म्हणजेच 1 नोव्हेंबरला उघडेल. 15 नोव्हेंबरपर्यंत स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याची कंपनीची योजना आहे.
फ्युजन मायक्रो फायनान्सचा नेट इंटरेस्ट इन्कम जून तिमाहीअखेर 184.68 कोटी होता, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 124.59 कोटी होता. जून तिमाहीत त्याचा निव्वळ नफा 75.10 कोटी रुपये होता, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 4.41 कोटी रुपये होता.
फ्युजन मायक्रो फायनान्सची सुरुवात 2010 मध्ये झाली. देशाच्या ग्रामीण भागातील महिलांना ही कंपनी आर्थिक सेवा पुरवते. जून तिमाहीअखेर तिची ग्रॉस ऍसेट अंडर मॅनेजमेंट 73.89 अब्ज रुपये होती, जी एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 59.6 टक्क्यांनी अधिक आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ग्लोबल हेल्थचा आयपीओ 3 नोव्हेंबरला उघडणार
Initial public offer : आयपीओचा आकार सुमारे 2,200 कोटी रुपये असेल. ऑफर फॉर सेल अंतर्गत अनंत इन्व्हेस्टमेंट्स, खाजगी इक्विटी फर्म कार्लाइल ग्रुपचे एक युनिट, सुनील सचदेवा (सुमन सचदेवासह संयुक्तपणे) शेअर्स विकणार आहेत.
मुंबई : मेदांता ब्रँड अंतर्गत रुग्णालये चालवणाऱ्या ग्लोबल हेल्थ लिमिटेड (Global Health Limited) ची प्राथमिक समभाग विक्री (Initial public offer-IPO) 3 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओ (IPO) मध्ये 7 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. आयपीओमध्ये 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय 5.08 कोटी शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये होणार आहे.
आयपीओचा आकार सुमारे 2,200 कोटी रुपये असेल. ऑफर फॉर सेल अंतर्गत अनंत इन्व्हेस्टमेंट्स, खाजगी इक्विटी फर्म कार्लाइल ग्रुपचे एक युनिट, सुनील सचदेवा (सुमन सचदेवासह संयुक्तपणे) शेअर्स विकणार आहेत. अनंत इन्व्हेस्टमेंट्सचा ग्लोबल हेल्थमध्ये 25.67 टक्के हिस्सा तर सचदेवा यांचा 13.43 टक्के हिस्सा आहे. आयपीओतून मिळालेली रक्कम कर्ज आणि सामान्य व्यवसायासाठी वापरली जाईल.
ग्लोबल हेल्थ लिमिटेडचे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण उत्पन्न 2,205.8 कोटी रुपये होते. या कालावधीत कंपनीला 196.2 कोटी रुपयांचा नफा झाला. ग्लोबल हेल्थची स्थापना प्रख्यात फिजिशियन नरेश त्रेहान यांनी केली होती. भारतातील उत्तर आणि पूर्वेकडील प्रदेशांमध्ये ही एक अग्रगण्य कंपनी आहे.
ग्लोबल हेल्थ गुरुग्राम, इंदूर, रांची, लखनौ आणि पाटणा येथे ‘मेदांता ब्रँड अंतर्गत पाच रुग्णालये चालवते. याशिवाय नोएडामध्ये त्यांचे एक हॉस्पिटल सुरू आहे. नोएडातील रुग्णालय आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सुरू होईल. तेव्हा कंपनीची एकूण खाटांची संख्या 3,500 पेक्षा जास्त असेल.