मिळाले १ कोटी २२ लाख
अमेरिकेतील टाउसन मॅरीलँड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने २ लॉटरीची तिकिटं यापूर्वीच खरेदी केली होती. मात्र, तो त्या तिकिटांबाबत पूर्णपणे विसरुन गेला होता. त्यामुळं तो पुन्हा लॉटरीच्या दुकानांत तिकिट खरेदी करण्यासाठी गेला.
नशीब जोरावर असेल तर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. अमेरिकेतील एका व्यक्तीला मोठा जॅकपॉट हाती लागला आहे. ६७ वर्षांच्या या व्यक्तीला १ कोटी २२ लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळं अगदी एका क्षणात हा व्यक्ती करोडपती झाला असून एका लॉटरीच्या तिकिटामुळं त्याचे नशीब फळफळले आहे.
अमेरिकेतील टाउसन मॅरीलँड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने २ लॉटरीची तिकिटं यापूर्वीच खरेदी केली होती. मात्र, तो त्या तिकिटांबाबत पूर्णपणे विसरुन गेला होता. त्यामुळं तो पुन्हा लॉटरीच्या दुकानांत तिकिट खरेदी करण्यासाठी गेला. त्यानं एकासारखेच तीन तिकिटं खरेदी केले होते. मात्र, या तिकिटांबाबत त्यानं घरात कोणालाही माहिती दिली नाही. त्याच्या पत्नीलाही याबाबत थोडीदेखील माहिती नव्हती.
तिन्ही तिकिटांसाठी त्याने ५-१-३-५-९ या क्रमांकाचा वापर केला होता. मात्र, या तिकिटांमुळं त्याचं नशीबच उजळलं आहे. तिन्ही तिकिटांमुळं त्याने १ कोटी २२ लाखांहून अधिक रक्कम जिंकली आहे. मात्र, एका चुकीमुळं त्याला इतकी मोठी रक्कम मिळाली आहे.
लॉटरी तिकिट खरेदी करताना त्याने त्याच्या मुलीच्या जन्मसालावरुन बेट लावली होती. त्यानं १९७९ हा क्रमांक सांगितला होता. मात्र, लॉटरीचे तिकिट देणाऱ्या व्यक्तीने त्याला चुकून १९९७ या क्रमांकाचे तिकिट दिले आणि त्याच क्रमांकाने त्याला करोडपती बनवलं. लॉटरी लागलेल्या या व्यक्तीने म्हटलं आहे की, तो जिंकलेली रक्कमेची दोन्ही मुलींमध्ये समान वाटणी करणार आहे.
एकाच कुटुंबातील तीन लोकांनी जिंकले ४१-४१ लाख
अलीकडेच अमेरिकेतील मॅरीलँड येथे राहणाऱ्या तीन जणांनी लॉटरीच्या लकी ड्रॉमध्ये नशीब आजमावल आणि त्यांना प्रत्येकी ४१ लाख रुपयांची धनराशी मिळवली आहे.
एकाच कुटुंबातील तीन लोकांनी जिंकले ४१-४१ लाख
अलीकडेच अमेरिकेतील मॅरीलँड येथे राहणाऱ्या तीन जणांनी लॉटरीच्या लकी ड्रॉमध्ये नशीब आजमावल आणि त्यांना प्रत्येकी ४१ लाख रुपयांची धनराशी मिळवली आहे.