दिवाळीच्या शुभेच्छा! अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि डॅनी डेन्ग्झोंपा यांचे ‘उंचाई’मध्ये असलेले एकमेकांशी नाते
खरी मैत्री ही कायम टिकणारी असते. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि डॅनी डेन्ग्झोंपा या चौघांमध्ये अशीच घट्ट आणि कायम राहाणारी मैत्री आहे. त्यामुळेच ‘उंचाई’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही कोणत्याही प्रसंगी, सणाला ते एकत्र येतात आणि तो प्रसंग, क्षण साजरा करतात. दिवाळीचा सणही या चौघांनी एकत्र येऊन साजरा केला आहे. येथे आपण त्यांना फुलबाजा उडवताना पाहात आहोत. त्यातून हे स्पष्टपणे दिसते की, ते त्यांचे जीवन मैत्रीच्या फुलबाजीने कसे उजळत आहेत.
स्वतः दिवाळी साजरी करीत असतानाच, ध्वनीमुक्त आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी अशी विनंती हे कलाकार प्रेक्षकांना करीत आहेत. शेवटी, दिवाळी म्हणजे वाईटाला दूर सारून चांगलं घडवणं. ही दिवाळी सर्व प्रेक्षकांना भावनेच्या एका वेगळ्या ‘उंचाई’वर घेऊन जावो ही, राजश्री प्रॉडक्शन आणि ‘उंचाई’च्या टीमकडून शुभेच्छा