नाशिक, दि. १९ (प्रतिनिधी) : कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या वतीने दीपावली आणि इतर उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या ‘खुशी का सीझन’च्या विशेष पाचव्या पर्वामधील विविध प्रस्ताव श्रेणींची घोषणा करण्यात आली. केएमबीएलकडून खानपान, प्रवास, ऑनलाईन परिधान, किराणा, विक्री दालने, दागदागिने, मॉल्स, ऑनलाईन डिलिव्हरी, आरोग्य आणि घरगुती सेवांवर १० हजार विविध ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याबाबत कोटक महिंद्रा बँकचे समूह अध्यक्ष आणि प्रमुख विराट दिवाणजी म्हणाले की, “कोटक महिंद्रा बँके’चा “खुशी का सीझन” आता परत आला आहे आणि यंदा प्रस्ताव मोठे तसेच चांगले आहेत, त्यात प्रत्येकासाठी “अगदी सगळंकाही” उपलब्ध असेल. किराणा, खानपान डिलिव्हरी, कपडे, स्मार्टफोन, प्रवास, याद्वारे खरेदी कधी नव्हे इतकी सुलभ झाली आहे. आमच्या ग्राहकांसाठी खरेदी तसेच सणांच्या खर्चावर विविध सवलती, कॅशबॅक आणि ईएमआय मिळणार आहेत. आमच्या ग्राहकांना विविध लाभ मिळवून देण्याचा आमचा अविरत प्रयत्न या ऑफर्सचा भाग म्हणता येईल. ज्यामुळे आमच्या ग्राहकांना आनंददायी बँकिंग अनुभव घेता येणार आहे, !”
ऑनलाईन तसेच इतर बऱ्याच विक्री मंचावर भरपूर सवलती आणि कॅशबॅक उपलब्ध आहे. केएमबीएलच्या ‘दरदिवशी विशेष’ (एव्हरीडे स्पेशल) वर्गवारीत आठवड्यातील सर्व दिवशी १० पेक्षा अधिक ब्रँडवर ऑफर उपलब्ध असतील. फक्त केएमबीएल डेबिट आणि क्रेडीट कार्डधारकांसाठी सर्व ऑफर्स उपलब्ध आहेत.