तुम्ही जर अजाणतेपणी तुमच्या संपर्कांमध्ये अधिक प्रमाणात स्पॅम करत असाल किंवा अनेक गुडमॉर्निंगचे मेसेजेस पाठवत असाल किंवा तुम्हाला खात्री नसलेली चुकीची माहिती पाठवणे चांगले वाटत असेल किंवा व्हॉट्सॲपची ब्रॉडकास्ट लिस्ट अतिरिक्त प्रमाणात वापरत असाल तर तुम्ही माहिती असूनही तुमचे अकाऊंट बॅन करण्याकडे पावले उचलत आहात, जर तुम्ही कंपनीच्या टर्म्स ऑफ सर्व्हिसचे उल्लंघन करत असाल तर उदाहरणार्थ स्पॅम, स्कॅम किंवा व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची सुरक्षा पणाला लावत असाल. व्हॉट्सॲपच्या मासिक युझर सेफ्टी रिपोर्ट नुसार २.३ दशलक्ष भारतीय वापरकर्त्यांची अकाऊंट्स ही एकट्या ऑगस्ट महिन्यात बॅन करण्यात आली आहेत.
व्हॉट्सॲप कडून सुरक्षा उपाय आणि प्रक्रियांचा संमिश्र प्रमाणात अवलंब करण्यात येत असून त्यामुळे या मंचावर वापरकर्त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होते, त्यांच्या कडून स्पॅम डिटेक्शन तंत्रज्ञानाचा वापर करुन स्पॅमचा वापर रोखण्यासाठी ते शोधणे आणि काही विचित्र काम झाल्यास त्यावर अंकुश ठेवण्यात येतो.
तुमचे अकाऊंट बॅन होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स खालीलप्रमाणे –
१. मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा : व्हॉट्सॲप कडून फॉरवर्डेड मेसेजेस साठी लेबल तयार केले असून त्याच बरोबर वापरकर्त्यांनी मेसेज शेअर करण्यापूर्वी विचार करावा यासाठी एक मेसेज किती वेळा फॉरवर्ड व्हावा यासाठी मर्यादा घालून दिली आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची खात्री नसेल की ती गोष्ट खरी आहे किंवा जर या मेसेजचा स्त्रोत माहिती नसल्यास तो फॉरवर्ड करु नका.
२. ऑटोमेटेड किंवा बल्क मेसेजेस करणे टाळा – बल्क मेसेजेस, ऑटो-मेसेज किंवा ऑटो-डायलचा वापर व्हॉट्सॲप वरुन करणे टाळा. व्हॉट्सॲप कडून मशीन लर्निंग तंत्रज्ञानासह रिपोर्ट्सचा वापर करुन वापरकर्त्यांना शोधून ज्या अकाऊंट्स वरुन गैरलागू ऑटोमेटेड मेसेजेस पाठवले जातात ती अकाऊंट्स बॅन केली जातात.
३. ब्रॉडकास्ट लिस्ट चा अतिवापर टाळा- तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्टचा वापर करुन जेंव्हा मेसेजेस पाठवता तेंव्हा ते तुमच्या फोन नंबर मध्ये असलेल्या काँटॅक्ट लिस्ट मधील नंबर्सनाच जातात. खूप वेळा ब्रॉडकास्ट लिस्टचा वापर केल्यास लोक तुमचे मेसेजेस रिपोर्ट करतात आणि जर अनेक वेळा रिपोर्ट झाल्यास तुमचे अकाऊंट व्हॉट्सॲप कडून बॅन केले जाते.
४. परवानगी विचारा आणि सीमारेषेचा आदर का- कोणत्याही ग्रुप मध्ये ॲड करण्या पूर्वी तुम्ही संपर्काची परवानगी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही ग्रुपवर कोणाला ॲड करता तेंव्हा ते स्वत:हून बाहेर पडतात, त्यांच्या या निर्णयाचा आदर करा. जर संपर्काने संदेश पाठवू नका असे सांगितले तर तुम्ही तुमच्या ॲड्रेस बुक मधून त्यांना काढून टाका आणि पुन्हा संपर्क करणे टाळा.
५. तुमच्या संपर्कांशी संवाद साधा- अशाच लोकांशी संपर्कात रहा ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा संदेश पाठवला आहे किंवा अशांशी संपर्कात रहा ज्यांनी व्हॉट्सॲप वर संपर्क करण्याची विनंती केली आहे.
६. व्हॉट्सॲपच्या टर्म्स ऑफ सर्व्हिसेस चे उल्लंघन करु नका – हे लक्षात घ्या की तुमचे अकाऊंट बॅन करण्याचे प्रमुख कारण म्हणजे व्हॉट्सॲपच्या टर्म्स ऑफ सर्व्हिसेस चे उल्लंघन होय, यामध्ये खोटेपणा प्रकाशित करणे आणि बेकायदेशीर, अपमानजनक, धमकावणी देणारा मजकूर, त्रासदायक वर्तन आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे. व्हॉट्सॲपच्या टर्म्स ऑफ यूज विषयी अधिक माहिती तसेच उदाहरणांसाठी तुम्ही टर्म्स ऑफ सर्व्हिसेस विभागातील ॲक्सेप्टेबल यूज ऑफ सर्व्हिसेस ला भेट देऊ शकता.
जर तुम्हाला वाटले की तुमचे अकाऊंट चुकून बॅन झाले आहे तर तुम्ही खालील टप्प्यांचा वापर करु शकता :
• व्हॉट्सॲप ला ई मेल करा किंवा ॲप मध्ये रिव्ह्यू करण्याची विनंती करा, व्हॉट्सॲप कडून केसचा अभ्यास करण्यात येईल आणि रिव्ह्यू पूर्ण करण्यासाठी तुमच्याशी लवकरात लवकर संपर्क साधण्यात येईल.
• तुम्ही ॲप कडे रिव्ह्यू करण्याची विनंती केल्या नंतर तुम्हाला एसएमएस द्वारे सहा आकडी रजिस्ट्रेशन कोड पाठवण्यात येईल.
• तो तुम्ही टाकल्यानंतर तुम्ही रिव्ह्यू साठी विनंती पाठवू शकता आणि केसशी संबंधित माहिती पाठवू शकता.