राज्यभरातील 561 मतदार बजावणार आपला मतदानाचा हक्क
मुंबई दि. १६ नोव्हेंबर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे. या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी सोमवारी मतदार होणार आहे. यासाठीची सर्व तयारी झाली आहे. देशभरातील सर्व राज्यांमध्ये हे मतदान होणार असून महाराष्ट्रातही मतदानाची पूर्ण तयारी झालेली आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मतदानाचे केंद्र असून तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील 561 प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री श्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आ. कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत. आज त्यांनी टिळक भवन येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. जे प्रदेश प्रदेश प्रतिनिधी मतदार आहेत, त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बारकोड असलेले ओळखपत्र दिलेले आहे. ते ओळखपत्र आणि दुसरे कुठलाही फोटो पुरावा ओळखपत्र जसे की मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक यापैकी एक अशी दोन्ही ओळखपत्रे दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.
या निवडणुकीत श्री मल्लिकार्जुन खर्गे व श्री शशी थरूर असे दोन उमेदवार आहेत. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले आहे.