“For the HERo in HER”
नावाप्रमाणेच डॉना आजच्या खऱ्या हिरोसाठी तयार करण्यात आले आहे – स्त्री
मुंबई, 15 ऑक्टोबर 2022– सिस्का ग्रुप या भारतातील आघाडीच्या एफएमसीजी ब्रँडने आज स्त्रियांसाठी खास तयार केलेले वैविध्यपूर्ण आणि वापरायला आरामदायी स्मार्टवॉच – सिस्का डॉना SSW106 लाँच केले. सिस्का समूह ही वैविध्यपूर्ण कंपनी आहे, जी विविध क्षेत्रांत कार्यरत असून ग्राहकांचे आयुष्य अधिक सुखकर बनवण्यावर भर देते.
SSW106 D
सिस्काने डॉनामध्ये प्रेगनन्सी ट्रॅकिंग समाविष्ट केले आहे. हे स्मार्टवॉच भावी आईला प्रसूती होण्यापूर्वी होत असलेली त्यांची प्रगती सांगते तसेच आरोग्य उंचावण्यासाठी खास शिफारसी करते. स्त्रियांचे स्वास्थ्य जपण्याच्या उद्देशाने या स्मार्टवॉचमध्ये अत्याधुनिक हेल्थ ट्रॅकिंग टुल समाविष्ट करण्यात आले आहे. या सुविधेमुळे स्त्रियांना त्यांची मासिक पाळी, गर्भधारणेसाठी अनुकूल काळ आणि इतर बरीच माहिती ट्रॅक व मॉनिटर करता येते तसेच वेळोवेळी वापरत स्वतःला आणखी सक्षम करता येते.
सिस्का डॉना SSW106 स्मार्टवॉचच्या लाँचप्रसंगी सिस्का समूहाच्या कार्यकारी संचालक श्रीमती ज्योत्स्ना उत्तमचंदानी म्हणाल्या, ‘स्मार्टवॉचेसनी साध्या घडयाळ्याच्या मूलभूत उपयुक्ततेच्या पुढे जात दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा घटक बनण्यापर्यंत प्रगती केली आहे. सिस्कामध्ये आम्ही सातत्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यावर भर देतोच, शिवाय त्यांच्या गरजा पूर्ण करत त्यांचे आयुष्य सोपे करतो. डॉनाच्या मदतीने आम्ही स्त्रियांसाठी खास तयार करण्यात आलेल्या स्मार्टवॉचेसची उणीव भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतात तयार करण्यात आलेले डॉना हे स्मार्टवॉच स्त्रियांच्या गरजा डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले आहे. हे सर्व वैशिष्ट्यांनी युक्त स्मार्टवॉच आजच्या मुली आणि स्त्रियांना आपले आरोग्य व स्वास्थ्यांची सूत्रे हाती घेण्यासाठी सक्षम करेल.’
सिस्का डॉना SSW106 स्मार्टवॉचची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये –
बीटी कॉल फंक्शन – युजर्सना वॉचवरून कॉल्स लावता/घेता/डिस्कनेक्ट करता येतील. फोन कॉल्सचे तपशील जाणून घेता येतील, आवडते कॉन्टॅक्ट्स निवडता येतील. अॅड्रेस बुक सिंक्रोनाइज करता येतील आणि थेट वॉचवरून आवाज कमी- जास्त करता येईल.
स्पॅन मोड – या वैशिष्ट्याच्या मदतीने युजरला वॉच डिस्प्ले दोन भागात विभागून मल्टी- टास्क करण्यास मदत होते.
रियल एसपीओ2 मॉनिटरिंग – युजर्सना स्वतःच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी मदत करण्यास सिस्काचे प्राधान्य असून रियल एसपीओ2 मॉनिटरिंग सुविधेमुळे त्यांना आपली ब्लड ऑक्सिजन पातळी मोजणे शक्य होते.
हवामानाची माहिती – या स्मार्टवॉचमध्ये आणखी एका आकर्षक वैशिष्ट्याचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे युजरला पाऊस, ढगाळ हवा, सूर्यप्रकाश यांसह हवामानाची स्थिती जाणून घेता येते तसेच वॉचवर तापमानही दाखवले जाते.
डिस्प्ले लॉक – युजर्सना स्मार्टवॉचमधील इनबिल्ट वैशिष्ट्य वापरून डिस्प्ले लॉक करता येतो व पर्यायाने आपले खासगीपण जपता येते.
हार्ट रेट ट्रॅकिंग – डॉना वॉचवरील हार्ट रेट मॉनिटरच्या मदतीने युजरला केव्हाही हृदयाचे ठोके मोजता येतात
बल्ड ऑक्सिजन आणि रक्त दाब – या वॉचमध्ये पीपीजी तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्य समावेश करण्यात आले आहे, ज्यामुळे ब्लड ऑक्सिजन आणि रक्तदाबाची पातळी मोजता येते.
मेसेज नोटिफिकेशन – मेसेज नोटिफिकेशन वैशिष्ट्यामुळे युजरने निवडलेल्या अॅपची नोटिफिकेशन्स मिळतात आणि १५ नवे मेसेजेस सेव्ह करता येतात.
स्लीप मॉनिटर – स्मार्टवॉचचा वापर करून युजरला आपल्या झोपेचा दर्जा तपासता येतील आणि रोज तो अद्ययावत ठेवता येईल.
ड्रिंक वॉटर आणि आयडल अलर्ट – प्रत्येक दिवशी सातत्याने पाणी पिणे आवश्यक आहे. युजर्सना वॉटर रिमाइंडरच्या मदतीने पाणी पिणे लक्षात ठेवता येईल.
म्युझिक – युजर्सना स्मार्टवॉचवरून संगीत कंट्रोल करता येणार असून प्ले, पॉज, नेक्स्ट आणि प्रीव्हियस साँग पर्याय वापरता येतील तसेच आवाज अडजस्ट करता येईल.
फाइंड फोन – वॉच जेव्हा अॅपला लिंक असेल, तेव्हा त्यावर टॅप केल्यास मोबाइल फोनवरून आवाज येईल
मल्टी- स्पोर्ट्स मोड – स्मार्टवॉचमध्ये स्पोर्ट्स आणि वर्कआउट मोड उदा. रनिंग, क्लायम्बिंग, सायकलिंग, बास्केटबॉल, फुटबॉल देण्यात आले आहेत.
14. इतर वैशिष्ट्ये – स्मार्टवॉच स्टेप्स आणि कॅलरीजची मोजदाद करते, पार केलेले अंतर मोजते आणि १० दिवसांत केलेल्या व्यायामाची नोंद ठेवते. त्याशिवाय यामध्ये अलार्म क्लॉक, स्टॉपवॉच, टायमर आणि डू नॉट डिस्टर्ब अशी महत्त्वाची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
धूळ आणि आयपी67 जलप्रतिबंधक असलेले हे वॉच चार्ज करण्यासाठी दोन तासांपर्यंतचा वेळ लागू शकतो. सिस्का वॉच रोज गोल्ड रंगात उपलब्ध असून त्यावरील १२ महिन्यांची उत्पादन वॉरंटी मिळते. हे उत्पादन सिस्का डॉना अॅपद्वारे सिंक करता येते व ते गुगल प्ले आणि अॅप स्टोअरशी कम्पॅटिबल आहे. हे स्मार्टवॉच आघाडीच्या रिटेल दालनांत ५९९९ रुपयांस उपलब्ध आहे.