जागतिक परफ्युमरी ब्रॅण्डकडून नवी मुंबईमधील एक्सक्लुसिव्ह शोरूमच्या उद्घाटनाची घोषणा, ब्रॅण्डकडून भारतभरात आपली ब्रिक-अॅण्ड-मोर्टर उपस्थिती वाढवण्याचे कार्य सुरूच
मुंबई, ऑक्टोबर २०२२: अजमल परफ्युम्स या नावामधूनच वारसा, उद्योग व गाथा दिसून येते. एका व्यक्तीची गाथा, ज्यांनी १९५० मध्ये परफ्युमरी समूहाची स्थापना केली ते म्हणजे भारतातील आसाम येथील होजालमधील हाजी अजमल अली आज उद्योगामध्ये प्रख्यात बनले आहेत. कामाप्रती निस्सीम आवडीमधून स्थापना करण्यात आलेली अजमल परफ्युम्स आजही त्यांची चिकाटी व व्यवसाय क्षमतेला दाखवते.
अजमल परफ्युम्समध्ये अत्तरनिर्मितीच्या कलेची सांगड सुवासांच्या माध्यमांतून अजरामर स्मृती तयार करण्याच्या शास्त्राशी घातली जाते. ब्रॅण्डचा ३०० हून अधिक उत्कृष्ट व आकर्षक सुगंधांचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. तसेच ब्रॅण्डचे जीसीसी व जगभरात ३०० हून अधिक विशेष रिटेल आऊटलेट्स आहेत. अजमल आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपलब्ध आहे; सध्या जगभरातील ४५ हून अधिक देशात अजमलची उत्पादने निर्यात केली जातात आणि निवडक ३० जागतिक ड्युटी-फ्री लोकेशन्स व आंतरराष्ट्रीय विमानसेवांच्या माध्यमातून विशेष उपस्थिती आहे.
भारतामध्ये अजमल परफ्युम्सची उत्पादने ३००० पॉइंट्स ऑफ सेल्सच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यांत मॉडर्न ट्रेड, जनरल ट्रेड, मल्टिब्रॅण्ड आउटलेट्स आणि ओन्ड रिटेल यांचा समावेश आहे. अजमल परफ्युम्स आता जवळपास ४० साइट्सवर उपलब्ध आहे. या साइट्सवर अजमल हा सर्वात मोठ्या सिंगल-ब्रॅण्ड परफ्युमरी ब्रॅण्ड्सपैकी एक आहे.
ब्रॅण्डच्या व्यापक फ्रँचायझी भागीदार नेटवर्कद्वारे किरकोळ उपस्थिती दृढ करण्याच्या दृष्टीकोनातून अजमल परफ्युम्सने नेरुळ, नवी मुंबई येथे एक अत्याधुनिक मॉडर्न परफ्युम बुटीक सुरू केले आहे. नवी मुंबईतील सर्वात नियोजित टाउनशिपमध्ये वसलेले हे स्टोअर त्याच्या प्रशस्त मांडणीसह आणि विविध श्रेणी व बजेटमध्ये आकर्षक परफ्युम्सच्या विस्तृत श्रेणीसह व्हिज्युअली सर्वोत्तम आनंद देते. स्टोअरच्या आतील भागात उबदारपणा, आकर्षकता आणि लक्झरी आहे, जे ब्रॅण्डच्या ७० वर्षांहून अधिक काळाच्या वारसाला सादर करतात. स्टोअरमध्ये फ्रॅग्रॅन्सची किंमत ६०० रूपये ते १७,००० रूपयांपर्यंत असेल.
“आम्हाला सर्वांची किमया समजते, जी अत्यंत जिव्हाळ्याच्या आठवणी जागृत करण्यासाठी सुगंध तयार करू शकते आणि जगभरात संवेदनांना चालना देऊ शकते. भारतीय मिलेनियल ग्राहक अधूनमधून परफ्युम वापरण्याऐवजी परफ्युमला त्यांच्या दैनंदिन ग्रूमिंगचा एक भाग बनवत आहेत. अजमल परफ्युम्समध्ये आमची वैशिष्ट्यपूर्ण असण्याची इच्छा आहे आणि हीच बाब आम्हाला त्यांच्यासाठीच नव्हे तर ग्राहकांच्या प्रत्येक पिढीसाठी फ्रॅग्रॅन्सेसची निर्मिती व पुनर्विचार करण्यास प्रेरित करते. अजमल परफ्युम्समध्ये आमची नवीन शाखा नेरूळ, नवी मुंबई येथे असण्याचा आम्हाला आनंद होत आहे,’’ असे भारतातील अजमल अॅण्ड सन्स – एनएचए विभागाचे बिझनेस मेन्टोर व परफ्युमिस्ट अब्दुल्ला अजमल म्हणाले.
या नवीन लाँचबाबत बोलताना भारतातील अजमल अॅण्ड सन्स – एनएचए विभागाचे अध्यक्ष सौरव भट्टाचार्य म्हणाले, ‘’नवी मुंबईमधील ग्राहक आमच्याकडे अजमल उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीची मागणी करत होते, जे संपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ असलेल्या स्टोअरमध्येच शक्य आहे. नवी मुंबई ही महत्त्वाची बाजारपेठ आहे, जेथे आमच्या उत्पादनांचे बरेच कौतुक करण्यात आले असून अनेक ग्राहक देखील आहेत. आम्हाला अजमल परफ्युम्समधील उत्पादनांच्या परिपूर्ण पोर्टफोलिओने युक्त असलेले नेरूळ, नवी मुंबई येथे आमच्या नवीन स्टोअरच्या उद्घाटनाची घोषणा करताना आनंद होत आहे.’’
अजमल परफ्युम्स बाबत:
१९५० च्या सुरूवातीला भारतातील आसाम येथे दिवंगत हाजी अजमल अली यांनी स्थापना केलेल्या अजमल परफ्युम्सचा प्रवास ‘ए फार्मर टू ए परफ्युमर’च्या गाथेचा आहे. दिवंगत हाजी अजमल अली यांच्या दूरदृष्टीमुळे आणि परफ्युमरीच्या क्राफ्टसाठी अविरत समर्पणामुळे अजमल परफ्युम्स एका सामान्य ट्रेडिंग हाऊसमधून लाखो-दशलक्ष डॉलर्सच्या कॉर्पोरेट कंपनीत विकसित झाली आहे. अजमल परफ्युम्सचे मुख्यालय दुबई, युनायटेड अरब एमिरेट्स येथे आहे. अजमलचा व्यवसाय अजमलच्या दुसऱ्या व तिसऱ्या पिढींच्या आवडीमधून चालवला जातो. प्रत्येक पिढी ब्रॅण्डचा विकास व वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. अजमल परफ्युम्स हा संपन्न वारसा असलेला ब्रॅण्ड आहे आणि हा वारसा परफ्युमरीच्या जटिल कलेमधील जवळपास सात दशकांचा अनुभव व ज्ञानामधून मिळालेला आहे.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या:
वेबसाइट: https://in.ajmalperfume.com/