मुंबई, ऑक्टोबर २०२२: ऑस्ट्रेलियामधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेराने आज नवीन, अत्याधुनिक अॅडवान्स्ड इंजीनिअरिंग लॅबचे उद्घाटन केले; ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी (एसीटी) व आसपासच्या भागांमध्ये कौशल्य प्रशिक्षणाला लक्षणीयरित्या चालना देण्यासाठी युनिव्हर्सिटीच्या प्रयत्नांमधील हा नवीन उपक्रम आहे.
बिल्डिंग २७ए मधील नवीन लॅब विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानांशी संलग्न होण्याकरिता प्रत्यक्ष, व्यावहारिक मार्गदर्शन करेल. “ही लॅब एसीटी प्रदेशामधील उद्योगांसाठी रोजगार-सक्षम पदवीधर देण्याच्या युनिव्हर्सिटीच्या स्थानिक मनसुब्याला वैयक्तिक चालना देईल,’’ असे युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीच्या कार्यकारी डीन प्रोफेसर जॅनिन डिकिन म्हणाल्या.
“जागतिक स्तरावर रोबोटिक्स व आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) यामधील कौशल्यांनी सक्षम व्यक्तींची गरज आहे. हे नवीन अध्यापन क्षेत्र फॅकल्टी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीला ड्रोन्स, प्रोग्रामेबल ऑटोनॉमस डिवाईसेस व रोबोटिक आर्म्स अशा तंत्रज्ञानांसह अध्यापनासाठी अविश्वसनीयरित्या स्थिर, खुले क्षेत्र देते.’’
अनेक विभिन्न वर्ग, कृती व प्रकल्पांमध्ये अवलंबता येऊ शकेल अशी सानुकूल लॅब असलेली अॅडवान्स्ड इंजीनिअरिंग लॅब सर्वोत्तम सुविधा देते, ज्यामध्ये विद्यार्थी रोबोटिक्स व आयओटी प्रकल्प निर्माण करू शकतात, त्यांच्यासह प्रयोग व सहयोग करू शकतात.
मूव्हेबल वर्कस्टेशन्स, सत्रे लाइव्हस्ट्रिम करण्यासाठी प्रोजेक्शन क्षमता आणि ग्राऊंड व एअर ड्रोन्ससाठी आऊटडोअर डेकने सुसज्ज असलेल्या या लॅबमध्ये हायर डिग्री बाय रिसर्च विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र समर्पित क्षेत्र देखील आहे.
“आम्हाला विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानांसह समकालीन अध्ययन अनुभव देण्याचा खूप आनंद होत आहे,’’ असे प्रोफेसर डिकिन म्हणाल्या.