कॉस्मोप्रोफ इंडियाचे त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य प्रदर्शनाच्या तिसऱ्या पर्वासह पुनरागमन
बी२बी प्रदर्शनाचे जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई, ऑक्टोबर, २०२२: कॉस्मोप्रोफ इंडिया हा भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या व जलदपणे विकसित होणाऱ्या सौंदर्य बाजारपेठ क्षेत्रासाठी आदर्श बी२बी इव्हेण्ट भारतातील आकर्षक स्थान व व्यवसायासाठी प्रमुख स्थान मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे ६ ते ८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित प्रदर्शनाच्या तिसऱ्या पर्वासह परतला होता .
कॉस्मोप्रोफ इंडिया आंतरराष्ट्रीय सौंदर्य समुदायासाठी ३६० डिग्री वर्ल्डवाइड व्यासपीठ कॉस्मोप्रोफ नेटवर्कचे गंतव्य आहे. इटलीमधील कॉस्मोप्रोफ वर्ल्डवाइड बोलोग्ना, सिंगापूरमधील कॉस्मोप्रोफ एशिया स्पेशल एडिशन, मुंबईमधील कॉस्मोप्रोफ इंडिया, लास वेगासमधील कॉस्मोप्रोफ नॉर्थ अमेरिका आणि बँकॉकमधील कॉस्मोप्रोफ सीबीई आसियान या प्रदर्शनांसह कॉस्मोप्रोफ व्यासपीठ जगभरातील ५००,००० हून अधिक व्यावसायिक व १०,००० प्रदर्शकांना विशेष व्यवसाय साधने व नवीन नेटवर्किंग संधी देते.
कॉस्मोप्रोफ इंडिया २०२२ युरोप, मध्य पूर्व, फार ईस्ट आणि इतर शेजारी देशांचे प्रतिनिधीत्व करत स्थानिक व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना सादर करत आहे. या बहुप्रतिक्षित २०२२ पर्वासाठी १२ देशांमधील ३०० हून अधिक प्रसिद्ध ब्रॅण्ड्सचे भव्य प्रदर्शन १०,५०० चौरस मीटरपर्यंतच्या विस्तृत प्रदर्शन क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आले होते. इटालियन ट्रेड एजन्सी (आयटीए) १५ इटालियन कंपन्यांसह उपस्थित होते , जे या प्रदर्शनामध्ये मेड इन इटली सौंदर्याचे सर्वोत्कृष्ट प्रस्ताव प्रदर्शित करण्यात आले होते .
इन्व्हेस्टमेंट एनएसडब्ल्यू कॉस्मोप्रोफ इंडिया २०२२ मध्ये ९ प्रदर्शन करणाऱ्या कंपन्यांसह ऑस्ट्रेलियातील स्किनकेअर, वेलनेस व न्यूट्रास्युटिकल्स उद्योगामधील सर्वात नाविन्यपूर्ण व अद्भुत ब्रॅण्ड्सना सादर करण्यात आले होते.