सृष्टी प्रीमियम व्हिस्की हे एक खास उत्पादन असून त्यात हळदीमधील अॅक्टिव्ह घटक असलेला करक्युमिन समाविष्ट करण्यात आला आहे. स्टर्लिंग रिझर्व्ह व्हिस्की कोला हे तरूणांच्या आवडीच्या कोलासह असलेले उत्पादन आहे.
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२२ – अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स (एबीडी) लि. या भारताच्या सर्वांत मोठ्या देशांतर्गत स्पिरिट्स कंपनीने ग्राहकांच्या कल्पनाशक्तीला दोन नवीन व्हिस्की बाजारात आणून चालना दिली आहे. त्यांनी सृष्टी प्रीमियम व्हिस्की आणि रिझर्व्ह बी७ व्हिस्की कोला मिक्स ही दोन उत्पादने आणली आहेत.
सृष्टी प्रीमियम व्हिस्की हे दुर्मिळ स्कॉच माल्ट्सचे मिश्रण असून ते भारतातील निवडक धान्यांच्या मद्यासोबत जोडलेले आहे आणि त्याला खास करक्युमिनची जोड देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यामुळे चव, सुगंध किंवा रंगात कोणताही फरक पडलेला नाही. विविध वर्गवारींमधील संशोधनातून दिसून येते की, करक्युमिनमध्ये सूज रोखण्याचे घटक आहेत आणि शरीरात निर्माण होणाऱ्या अँटी ऑक्सिडंट्स वाढवण्याची क्षमता आहे. परंतु उत्पादनासंदर्भात कंपनी अशा कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.
स्टर्लिंग रिझर्व्ह बी७ व्हिस्की कोला मिक्स हे पुरस्कार विजेते व्हिस्कीचे मिश्रण आहे. त्यात मद्य पिण्याच्या प्रत्येक निमित्ताला धमाल आणण्यासाठी कोलाची चव देण्यात आली आहे. व्हिस्की कोला मिश्रण बाटलीत, पाण्याच्या ग्लासमध्ये, सोडा किंवा एक शॉट म्हणून पिण्यात येते तेव्हा व्हिस्कीचा रंग कायम ठेवते.
या निमित्ताने बोलताना एबीडीचे कार्यकारी उपाध्यक्ष शेखर राममूर्ती म्हणाले की, “एबीडीमध्ये आम्ही आमच्या ‘थिंक डिफरंटली’ या केंद्रीभूत मूल्याचा विचार करत आहोत. सृष्टी आणि स्टर्लिंग रिझर्व्ह बी७ व्हिस्की कोला हे एका बदलत्या नावीन्यपूर्ण दृष्टीकोनाचे प्रतीक आहेत. आम्ही त्यावर काम करून आमच्याकडे अवलंबत आहोत. ही दोन्ही उत्पादने ग्राहकांच्या आवडीनुसार बनवली असून भारतीय बाजारपेठेतील अशी पहिली आहेत.”
या नवीन अनावरणाबाबत बोलताना धोरण, मार्केटिंग प्रमुख आणि बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर विक्रम बासू म्हणाले की, “सृष्टी हा खरोखर आगळावेगळा ब्रँड आहे. अगदी त्यातील करक्युमिनच्या समावेशापासून ते उत्पादनाच्या नावापर्यंत आणि बाजारात येण्यापूर्वी त्याच्या मेटाव्हर्सवरील उद्घाटनापर्यंत. सृष्टीवर आम्ही मागील काही वर्षांपासून काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला ग्राहकांना एका आश्चर्यकारक नैसर्गिक घटकासह उत्तम व्हिस्की देणे शक्य झाले आहे. स्टर्लिंग रिझर्व्ह बी७ व्हिस्की कोला चवीसोबत व्हिस्की आवडणाऱ्या तरूणांसाठी आहे आणि कोला तर जागतिक स्तरावर विजेता आहे.”
या उत्पादनाबाबत बोलताना एबीडीचे कार्यकारी संचालक अरूण बारीक म्हणाले, “या नवीन उत्पादनांच्या निर्मितीत ब्लेंडरचा अनुभव आणि तंत्रज्ञानाचा वापर, अनेक वर्षांचे संशोधन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यात असलेल्या टीम्सचा उत्साह या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आहे. आम्ही या आगळ्यावेगळ्या उत्पादनांना देण्याचे आव्हान स्वीकारले असून मला विश्वास आहे की, ग्राहकांनाही ती नक्कीच आवडतील.”
सृष्टी बाजारात आणण्याबाबत रिव्हरच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सोहिनी पानी म्हणाल्या की, “ब्रँडचे पॅकेजिंग, दृश्य ओळख आणि सृष्टीसाठी संवादाची संकल्पना या सर्व गोष्टींसाठी आम्ही निसर्गाकडून प्रेरणा घेतली. हा ब्रँड निसर्ग आणि मूळ संकल्पना यांचा उत्सव आहे. सृष्टी चांगल्या साहित्यापासून बनवलेल्या उत्पादनांची आवड असलेल्यांना अपील करेल.”
आपल्या ग्राहकांना खास अनुभव देण्याच्या आपल्या ट्रेंडला पुढे नेत असताना सृष्टी प्रीमियम ब्लेंडेड व्हिस्कीचे पहिले अनावरण एबीडी मेटाबारमध्ये मेटाव्हर्समध्ये https://abdmetabar.com/ करण्यात आले असून त्यानंतर महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये ते लवकरच येईल. स्टर्लिंग रिझर्व्ह बी७ व्हिस्की कोला हल्लीच आसाममध्ये बाजारात आला आहे आणि तो या सीझनमध्ये राष्ट्रीय पातळीवर येईल. हे दोन्ही ब्रँड्स तीन पॅक आकारांमध्ये उपलब्ध आहेत- ७५० मिली, ३५० मिली आणि १८० मिली.