नोएडा – ऑक्टोबर ४, २०२२ – EbixCash लिमिटेड या बी२सी, बी२बी व आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील डिजिटल उत्पादने व सेवांच्या तंत्रज्ञान सक्षम प्रदाता कंपनीने आज जाहिर केले की, त्यांचा परकीय चलन विभाग EbixCash वर्ल्ड मनीने विदेशी चलनांच्या नोटांच्या आयात व निर्यातीसाठी अल फरदान एक्स्चेंज एलएलसी, यूएसईसोबत धोरणात्मक सहयोग करारावर स्वाक्षरी केली आहे. अल फरदान एक्स्चेंज एलएलसीच्या व्यवसाय धोरणाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हसजन जाबर अल फरदान आणि EbixCash पेमेंट सोल्यूशन्स डिव्हिजनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. टी. सी. गुरूप्रसाद यांनी दोन्ही कंपन्यांमधील वरिष्ठ व्यवस्थापन मंडळांच्या उपस्थितीमध्ये या करारावर स्वाक्ष-या केल्या.
EbixCash लिमिटेड विमा, आर्थिक, आरोग्यसेवा व ई-लर्निंग उद्योगांना ऑन-डिमांड सॉफ्टवेअर व ई-कॉमर्स सेवांची आघाडीची आंतरराष्ट्रीय पुरवठादार कंपनी एबिक्स इन्क. (NASDAQ: EBIX)ची उपकंपनी आहे.
वर्ष १९७१ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या बहुआयामी अल फरदान ग्रुपची शाखा एल फरदान एक्स्चेंज यूएईमधील पहिली व सर्वात मोठी एक्स्चेंज कंपनी आहे. अल फरदान एक्स्चेंज अमिरातीमधील आपल्या ७० हून अधिक प्रबळ नेटवर्कच्या माध्यमातून यूएसईच्या कॉस्मोपॉलिटन समुदायाला सेवा देते.
“परकीय चलनाच्या नोटांच्या आयात आणि निर्यातीसाठी अल फरदान एक्सचेंज, एलएलसी, यूएई सोबत धोरणात्मक सहयोगाची औपचारिक घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे,’’ असे EbixCash वर्ल्ड मनीचे व्यवस्थापकीय संचालक टी. सी. गुरुप्रसाद म्हणाले. “या सहयोगामुळे आम्हाला परकीय चलनाच्या नोटा भारत ते यूएईपर्यंत, तसेच यूएई ते भारतपर्यंत सर्वात सोयीस्कर व विनासायास विकता येतील. यामुळे आम्ही किंमत व लॉजिस्टिक्समध्ये स्पर्धात्मकतेसंदर्भात अग्रस्थानी राहू आणि आम्हाला आमच्या मोठ्या बँकनोट क्लायंट बेसची अधिक कार्यक्षमतेने सेवा करण्यास मदत होईल.”
EbixCash लिमिटेडचा परकीय चलन विभाग EbixCash वर्ल्ड मनी भारतातील परकीय चलन व्यवसायामध्ये अग्रस्थानी आहे. कंपनीच्या व्यापक नेटवर्कमध्ये ८१ हून अधिक रिटेल शाखा, २५० फ्रँचायझी भागीदार व शुल्क-मुक्त शॉप्स, २७ हून अधिक बँक क्लायंट्स, १२०० हून अधिक कॉर्पोरेट क्लायंट्स, तसेच भारतातील टॉप फॉर्च्युन ५०० क्लायंट्स व पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. EbixCash वर्ल्ड मनी १६ हून अधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ व १२ बंदरांमधील रिटेल किओस्क्ससह भारतातील विमानतळ व बंदर मनी एक्स्चेंज व्यवसायामधील देखील आघाडीची कंपनी आहे.
EbixCash विषयी
३१ डिसेंबर २०२१ पर्यंत भारतभरात आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये कार्यरत ६५०,००० फिजिकल एजंट डिस्ट्रिब्युशन आऊलेट्सपासूनची सर्व माध्यमातून कार्यरत ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म्सची सांगड घालणा-या “फिजिटल” धोरणावर चालणाऱ्या या कंपनीच्या सॉफ्टवेअर आणि सेवांच्या वित्तीय व्यवहार पोर्टफोलिओमध्ये भारतासह ७५ हून अधिक देशांमधील डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय मनी रेमिटन्स, फॉरेन एक्स्चेंज (FOREX), प्री-पेड गिफ्ट कार्डस्, युटिलिटी पेमेंट्स, प्रवासी सेवा आणि तंत्रज्ञानासाठी विमा, बस माहिती यंत्रणा, कर्जपुरवठा आणि वित्तव्यवस्थापनाचा समावेश आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकात्यासह सुमारे १६ आंतरराष्ट्रीय विमानतळांवर EbixCashचे फॉरेक्स व्यवहार चालतात. EbixCash ही ठोक व्यवहार मूल्यावर आधारित आंतरराष्ट्रीय रेमिटन्स व्यापाराच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. EbixCash आपल्या ट्रॅव्हल पोर्टफोलिओच्या माध्यमातून (Via.com आणि EbixCash.com) भारतामध्ये स्थित अग्रगण्य ट्रॅव्हल एक्स्चेंज कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी आपल्या ५१७,००० एजंट्सच्या माध्यमातून आणि सुमारे १७,९०० नोंदणीकृत कॉर्पोरेट क्लाएंट्सद्वारे दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठांत आपली सेवा पुरविते. EbixCash चा वित्तीय तंत्रज्ञान व्यापार संपत्ती, मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापन, विमा आणि बस माहिती यंत्रणेच्या क्षेत्रातील आपल्या अनेक ग्राहकांना सॉफ्टवेअर उपाययोजना पुरवते. EbixCash ची बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग सेवा अनेक उद्योगक्षेत्रांना माहिती तंत्रज्ञान तसेच कॉल सेंटर सेवा पुरवते. अधिक माहितीसाठी कंपनीची वेबसाइट www.ebixcash.com येथे भेट द्या.
अस्वीकृती:
आवश्यक मान्यता, बाजारपेठेची स्थिती आणि इतर बाबी लक्षात घेऊन आपल्या इक्विटी शेअर्सची इनिशियल पब्लिक ऑफर जारी करण्याचा प्रस्ताव EbixCash Limited ठेवत आहे आणि कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे एक ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) सादर केले आहे. हे DRHP सेबीची वेबसाइट www.sebi.gov.in येथे तसेच बुक रनिंग क्षेत्रातील अग्रगण्य व्यवस्थापन कंपनी मोतीलाल ओस्वाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड यांची वेबसाइट www.motilaloswalgroup.com, इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाइट www.equirus.com, ICICI सिक्युरिटीज लिमिटेडची वेबसाइट www.icicisecurites.com, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेडची वेबसाइट www.sbicaps.com आणि YES सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेडकडे www.yesinvest.in यांच्याकडे तसेच www.bseindia.com व www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइट्सवरही उपलब्ध आहेत. गुंतवणूकदारांना कृपया नोंद घ्यावी की, इक्विटी शेअर्समधील गुंतवणूकीमध्ये उच्च दर्जाची जोखीम अंतर्भूत असते आणि अशा जोखमीशी संबंधित तपशीलांसाठी RHP वर ‘रिस्क फॅक्टर्स’ पहावेत. संभाव्य गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय घेताना DRHP वर अवलंबून राहू नये.
Ebix, Inc. विषयी
६ खंडांमध्ये सुमारे २०० कार्यालये असणारी Ebix,Inc., (NASDAQ : EBIX) कंपनी विमा, वित्तीय सेवा, प्रवास, आरोग्यसेवा आणि ई-लर्निंग उद्योगक्षेत्रांना ऑन-डिमांड सॉफ्टवेअर आणि ई-कॉमर्स सेवा पुरविण्याचा प्रयत्न करते.
विम्याच्या क्षेत्रामध्ये ऑन-डिमांड तत्वावर इन्शुरन्स आणि रिइन्श्युरन्स एक्स्चेंजेसची विस्तृत श्रेणी विकसित आणि कार्यरत करण्यावर Ebix ने आपले लक्ष केंद्रित केले आहे. तसेच कंपनीकडून CRM च्या क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर-अॅज-अ-सर्व्हिस (“SaaS”) उद्योग उपाययोजना पुरवली जाते व जगभरातील कंपन्यांना फ्रंट-एंड आणि बॅक-एंड यंत्रणा, आउटसोर्स्ड व्यवस्थापन आणि रिस्क कम्प्लायन्स सेवा पुरवली जाते.
सहा खंडांतील हजारो ग्राहकांना उत्पादने, मदत आणि सल्लागार सेवा पुरविण्यासाठी आपल्या अनेक SaaS आधारित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून Ebixने विशिष्ट क्षेत्राशी संबंधित टेक्नोलॉजी प्रोफेशनल्सना नोक-या दिल्या आहेत. अधिक माहितीसाठी कंपनीची वेबसाइट www.ebix.com येथे भेट द्या.