तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. म्हणून हे निरोगी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीसाठी फायदेशीर मानले जाते.
तूप भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग समजला जातो. क्वचितच असे घर असेल जिथे तुप वापरले जात नाही. तूप फक्त चवीलाच उत्तम नाही तर त्याचा सुगंध जेवणाला अधिक अप्रतिम बनवतो. बहुतेक लोक याचा वापर डाळ, भाजी करण्यासाठी तसेच चपातीवर लावण्यासाठी करतात. तूप केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही देतो. पण जर तुम्हाला तुपाचे फायदे दुप्पट करायचे असतील तर येथे सांगितलेल्या ५ गोष्टींसह त्याचे सेवन सुरू करा.
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ शरद कुलकर्णी सांगतात की, तुपात अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्याचे काम करतात. हळद, कापूर, तुळस, दालचिनी यांसारख्या औषधी वनस्पतींसोबत तूप खाल्ल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात. फक्त एकदा किंवा दोनदा याचे सेवन करणे तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी पुरेसे आहे.