सुजित धाडवे (प्रतीेनिधी)
मुंबई : धारवली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद माहे सप्टेंबर 2022 चे आयोजन रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा धारवली तालुका पोलादपूर येथे करण्यात आले होते नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून या शिक्षण परिषदेपूर्वी रायगड जिल्हा परिषद शाळा धारवली व्यवस्थापनाकडून आपल्या कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सर्वस्व समर्पित करून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या २१ प्रेरणादायी महिलांना “नवदुर्गा स्त्री शक्ती सन्मान” देऊन सन्मानित करण्यात आले या अभिनव उपक्रमातून अनपेक्षितपणे महिलांचा झालेला सन्मान अनेक महिलाना ऊर्जा देणारा ठरेल हा आत्मविश्वासपूर्वक मनोदय धारवली केंद्र शाळा मुख्याध्यापक प्रदीप पवार यांनी व्यक्त केला.
धारवली ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच अश्विनी विश्वास सातपुते यांच्या शुभ हस्ते २१ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये धारवली केंद्राच्या सन्माननीय केंद्रप्रमुख श्रीमती रंजना जाधव मॅडम, सवाद माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जोत्सना मेहता, सहाय्यक शिक्षिका सुनंदा जावळे , माटवण शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पवार, पाटीलवाडी शाळेच्या उपशिक्षिका स्मिता चिनके, माटवण आदिवासीवाडी शाळेच्या उपशिक्षिका निलावती बनसोडे, धारवली शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मिलन रणदिवे सदस्या विंकीता सकपाळ, मानसी गमरे , करिष्मा महाडिक अंगणवाडी मदतनीस वनिता सकपाळ धारवली शाळा मदतनीस श्रीमती जयवंती मोरे यांना सन्मानित करण्यात आले तर धारवली केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती. रंजना जाधव मॅडम यांच्या हस्ते अश्विनी विश्वास सातपुते सरपंच ग्रुप ग्रामपंचायत धारवली यांचा सन्मान करण्यात आला तसेच इंदिरा लावंड मुख्याध्यापिका सवाद, सौ छाया पाटील मुख्याध्यापिका काळवली पाटील वाडी, माध्यमिक विद्यालय सवादच्या सहाय्यक शिक्षिका राजश्री काकडे जनाली उतेकर ,स्नेहल जैतपाल अंगणवाडी श्रीमती फहमिदा पठाण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कीर्ती सकपाळ सदस्या अनया सातपुते आशा सेविका किरण जैतपाल यांना प्रतिनिधी मार्फत सन्मानपत्र वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमातून कुटुंबात व समाजात स्त्री व्यक्तिमत्वाचा सन्मान वाढण्यास निश्चित मदत होईल. कुटुंबाचा व समाजाचा आधार बनू पाहणाऱ्या अनेक महिलांना प्रेरणादायी ठरतील अशा महिलांचा सन्मान धारवली केंद्रशाळेकडून करण्यात आल्याबद्दल सर्व महिलांच्या कडून आभार व्यक्त करण्यात आले.