IND vs SA: दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने विजय साकारला. पण आता तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी विराट कोहली आणि लोकेश राहुल खेळणार नसल्याचे समोर आले आहे. राहुल आणि कोहली दोघएही चांगल्या फॉर्मात होते. पण तरीही ते आता तिसऱ्या लढतीत खेळणार नाही. या दोघांना तिसऱ्या लढतीसाठी सघात स्थान का दिले नाही, जाणून घ्या…
तिसऱ्या सामन्यासाठी कोहलीबरोबर लोकेश राहुललाही विश्रांती देणार असल्याचे आता समोर येत आहे. दुसऱ्या सामन्यात राहुलने दमदार खेळी साकारली होती. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी दमदार फटकेबाजी केली. राहुलने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि आपले इरादे यावेळी स्पष्ट केले. रोहित आणि राहुल यांनी त्यानंतर गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. रोहित शर्मा यावेळी मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि त्याला आपली विकेट गमवावी लागली. रोहितने यावेळी ३७ चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाला असला तरी राहुल मात्र दमदार फलंदाजी करत होता. राहुलने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर राहुल जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. राहुलने यावेळी २८ चेंडूंमध्ये २८ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली होती.
कोहली आणि राहुल यांना तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे दोघेही थेट भारतीय संघामध्ये थेट विश्वचषकासाठी पाहायला मिळतील.