• कायम लक्ष्यकेंद्रित वाटप, शिस्तबद्ध वैविध्य राखले जाणार
• लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपमधील त्या त्या उद्योगातील अग्रेसर आणि मजबूत व्यवसायात
गुंतवणुकीचे उद्दिष्ट
• मॅक्रो-बेस्ड व्हॅल्युएशन चेक (अतिरिक्त पडताळा) हे एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंडाचे एक
महत्त्वाचा वेगळेपण आहे ज्यामुळे भांडवली बाजारामधील वाढीच्या संधी न गमावता, अतिमूल्यांकन
किंवा बुडबुड्यांचे सापळे टाळले जातील
• एनएफओ कालावधी: गुरुवार, ६ ऑक्टोबर २०२२ ते गुरुवार, २० ऑक्टोबर २०२२;
एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंड बुधवार, २ नोव्हेंबर २०२२ पासून निरंतर खरेदी-विक्री व्यवहारांसाठी
पुन्हा खुली होईल.
मुंबई, २९ सप्टेंबर २०२२ : एलआयसी म्युच्युअल फंडाने आज “एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंड” प्रस्तुत करीत
असल्याची घोषणा केली. ही गुंतवणुकीस कायम खुली (ओपन-एंडेड) समभागसंलग्न अर्थात इक्विटी योजना
असून, जी सर्व बाजार भांडवल श्रेणीतील समभागांमध्ये गुंतवणूक करेल.
एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंडातून लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये प्रत्येकी किमान २५ टक्के
गुंतवणूक केली जाईल आणि निधी व्यवस्थापकाने शिस्तबद्ध दृष्टिकोनाचा अवलंब करून व त्याच्या
विवेकबुद्धीनुसार संपूर्ण बाजार भांडवलात लवचिकतेने गुंतवणूक करण्यासाठी उर्वरित २५ टक्क्यांच्या वापराला
मुभा असेल.
नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) गुरुवार, ६ ऑक्टोबर २०२२ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुली होईल आणि गुरुवार,
२० ऑक्टोबर २०२२ रोजी ती बंद होईल. ही योजना बुधवार, २ नोव्हेंबर २०२२ पासून निरंतर खरेदी-विक्री
व्यवहारांसाठी पुन्हा खुली होईल.
एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंड सर्व तीन – लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप – बाजार भांडवल प्रकारातील
समभागांमध्ये गुंतवणुकीचे केंद्रित स्वरूपात वाटप करेल, ज्याद्वारे पोर्टफोलियोला नेहमीच शिस्तबद्ध
वैविध्य प्रदान केले जाईल.
एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंडाचे मुख्य वेगळेपण हे या योजनेंतर्गत विकसित 'मॅक्रो बेस्ड व्हॅल्युएशन चेक
(एमव्हीसी)' हे असणार आहे. ज्यायोगे समभाग गुंतवणुकीतील जोखीम अधिमूल्य, व्याज दर आणि कंपन्यांच्या
मिळकतीतील वाढ आदी घटक विचारात घेऊन विकसित होत असलेल्या बदल व घडामोडींच्या अनुषंगाने
पोर्टफोलिओसाठी निवडल्या गेलेल्या समभागांमध्ये निधीचे वाटप संतुलित अर्थात कमी-जास्त केले जाईल.
गुंतवणुकीच्या या अनन्य आकृतिबंधाशी समष्टी अर्थव्यवस्थेच्या संकेतांची जुळणी करून बाजार मूल्यांची गणना
केले जाईल. यात तळच्या (लोअर-एंड) आणि उच्च स्थानी (हाय-एंड) असलेल्या पी/ईची गणना करणे आणि
इष्टतम पोर्टफोलिओ-स्तरीय पीईजी बँडवर पोहोचणे अपेक्षित आहे.
या प्रसंगी बोलताना, एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी टी एस
रामाकृष्णन म्हणाले : “शिस्तबद्ध वैविध्य आणि केंद्रित वाटप या दोन पैलूंना गुंतवणूकदारांकडून प्राधान्य दिले
जाते. एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंड गुंतवणूकदारांना विवेकपूर्ण निवडीसह आणि शिस्तबद्ध वैविध्य जपत
सर्वच बाजार भांडवलांतील समभागांमध्ये आणि त्या त्या बाजार भांडवलात नेतृत्व स्थान असलेल्या कंपन्यांमध्ये
गुंतवणूक करण्याची संधी देईल. एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंडाचे वेगळेपण ही एक अद्वितीय गुंतवणूक
चेकलिस्ट असेल ज्याचा उद्देश सर्व बाजार भांडवल श्रेणीमधील उदयोन्मुख नेतृत्वदायी कंपन्यांना ओळखणे
आहे.”
मुख्य गुंतवणूक अधिकारी – समभाग, श्री. योगेश पाटील म्हणाले : “एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंडाने समभाग
निवड आणि बाजार भांडवल श्रेणीत गुंतवणुकीला विभागण्यासाठी एक मजबूत गुणात्मक आणि परिमाणात्मक
आकृतीबंध स्वीकारला आहे. एमव्हीसी (मॅक्रो बेस्ड व्हॅल्युएशन चेक) या अंतर्गत विकसित आकृतीबंधाचा वापर
करून कठोर मूल्यमापन शिस्त राखण्यास मदत तसेच, बदलत्या समष्टी परिवर्तन व घडामोडींच्या अनुषंगाने
वाटपात कसे फेरबदल केले जावेत, याचे दिशादर्शन केले जाईल, हे आमचे मुख्य वेगळेपण आणि मूल्यवर्धन
यातूनच निर्माण होईल."
"भांडवली बाजारामधील वाढीच्या संधी न गमावता, अतिमूल्यांकन किंवा बुडबुड्यांचे सापळे टाळले जातील
यासाठी एमव्हीसी हा एक आवश्यक मार्ग असेल." श्री. पाटील म्हणाले: "एमव्हीसीमधून खरेतर निरंतर आधारावर
पोर्टफोलिओच्या पडताळा व देखरेखीचा एक अतिरिक्त स्तर प्रदान केला जाईल."
मल्टीकॅप धोरणाबाबत एलआयसीएमएफचा दृष्टिकोन संभाव्यत: विजेते म्हणून उदयास येत असलेल्या
कंपन्यांमधील गुंतवणुकीला चिकटून राहण्याच्या तत्त्वज्ञानावर आधारित असेल आणि मजबूत खंदक आणि
सुस्पष्ट वाढक्षम व्यवसाय असलेल्या त्या त्या बाजार भांडवलातील उद्योग अग्रणींना ओळखण्याचा ते प्रयत्न
करेल.
एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंडासाठी प्रथम-स्तरीय मानदंड हा निफ्टी ५०० मल्टिकॅप ५०:२५:२५ टीआरआय
असेल, जे सर्व बाजार भांडवल घटकांना सामावून घेते आणि त्यामुळे योजनेसाठी अधिक वैविध्य आणि तिच्या
कामगिरीचा योग्य तुलनात्मक वेध घेणे शक्य बनविते.
एलआयसीएमएफ मल्टीकॅप फंडाचे निधी व्यवस्थापक श्री. योगेश पाटील हे असतील.
एलआयसी म्युच्युअल फंडाबद्दल : एलआयसी म्युच्युअल फंडाची (एलआयसीएमएफ) स्थापना २० एप्रिल १९८९ रोजी
एलआयसी ऑफ इंडियाने केली. हा भारतातील सर्वात जुना आणि आघाडीचा म्युच्युअल फंड आहे, जो विमा
उद्योगातील विश्वसनीय नाममुद्रा एलआयसीद्वारे प्रायोजित केला गेला आहे. एलआयसीएमएफ डे़ट, इक्विटी, हायब्रिड,
पॅसिव्ह आणि सोल्युशन ओरिएंटेड योजनांचा समावेश असलेल्या २७ उत्पादनांची परिपूर्ण श्रेणी प्रस्तुत करते.
एलआयसीएमएफची सरासरी व्यवस्थापनयोग्य मालमत्ता (एएयूएम) ३१ ऑगस्ट २०२२ रोजी १७,७३४ कोटी रुपये आहे.
३१ शाखा कार्यालये आणि १८२ गुंतवणूकदार सेवा केंद्रांद्वारे (ऑगस्ट २०२२ पर्यंत) एलआयसीएमएफ कार्यरत आहे.