मुंबई, 03 ऑक्टोबर, 2022: युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने आज महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त वंचित घटकांचे सबलीकरण करण्याच्या उद्देशाने विशेष उपक्रम आयोजनाची घोषणा करण्यात आली. बँकेचा विशेष उपक्रम दिनांक 15 सप्टेंबर – 1 ऑक्टोबर या काळात होणार असून वित्तीय समावेशकतेचा प्रचार, विस्तारीत सामाजिक सुरक्षा, परवडणाऱ्या बँकिंग सेवा, सुलभ कर्ज सुविधा आणि विस्तारीत सामाजिक कल्याणाचा प्रचार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
या अभिनव सामाजिक दायित्व उपक्रमात स्वच्छ परिसर, चांगले आरोग्य आणि सर्वसमवेशी सेवा तत्त्वे राखण्यात गरजूना मदत करण्यात येणार आहे.
वित्तीय सर्वसमावेशकतेत बँकेकडून ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत:
- प्रधान मंत्री जन धन योजना.
- ग्रामीण समुदायांत बचतगटांना वित्तीय साह्य.
- डेट स्वॅप अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड पद्धतीद्वारे साह्य.
- रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी क्युआर कोडचे वाटप.
- मुद्रा कर्ज.
या विशेष उपक्रमाद्वारे युनियन बँक ऑफ इंडिया पीएमजेडीव्हाय, बचतगट, मुद्रा कर्जांमार्फत 10 लाखांहून अधिक ग्राहकांना साह्य उपलब्ध करून दिले आहे.
त्याशिवाय या प्रसंगी बँकेने घोषणा केली:
- शाळांसाठी 250 स्वच्छतागृहांचे बांधकाम (खासकरून मुलींसाठी) तसेच भारतातील ग्रामीण/निम-शहरी भागांतील घरांसाठी 100 स्वच्छतागृहांची बांधणी.
- प्रदेशातील अनाथालयं आणि वृद्धाश्रमांच्या नियमित आवश्यकतांकरिता अत्यावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे.
युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ ए. मणीमेखलाई यावेळी म्हणाले, “समाजाच्या सर्वच थरांतील घटकांना अर्थसाह्य पुरविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्रिशंकूच्या खालच्या स्तरातील व्यक्तिंचे कल्याण आणि वित्तीय समावेशक होण्यातील मुख्य घटक बनण्याचा आमचा प्रयत्न असेल.”