माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी सांगितलं की, 4 राऊंड गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. यात तीन लोक जखमी झाले आहेत. गोळी मारणारा व्यक्ती आणि ज्याला गोळी लागली आहे, ते सर्व आसपासच्या परिसरातील रहिवासी आहेत. दहीहंडीच्या वेळी त्यांच्यात काहीतरी वाद झाला होता. याचाच राग मनात धरून आरोपीनं हा गोळीबार केला.
अंकित यादव, अभिनाश दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण या चौघांवर हा गोळीबार झाला आहे. अंकित यादव या तरुणाचा गोळीबारात मृत्यू झाला. रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. यात दोनजण दुचाकीने आले आणि त्यांनी गोळीबार केला, अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. कांदिवली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. कांदिवली पोलीस या घटनेचा पुढील तपस करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.
© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.