क्रेड पेसाठी सुयोग्य असलेल्या पेमेंटसोबत स्कॅन अँड पे फीचर सर्व ठिकाणी पेमेंटसाठी एक विश्वासू माध्यम ठरेल
बंगळुरू, १ ऑक्टोबर २०२२: क्रेड, या कर्ज देऊ शकणाऱ्या व्यक्ती, ब्रँड्स आणि संस्थांच्या प्रचंड विश्वासार्ह समुदायाने आज स्कॅन अँड पे हा सदस्यांसाठीचा यूपीआई पेमेंट अनुभव अॅपवर सुरू केला आहे. आता ग्राहकांना कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून क्रेड अॅपशी जोडलेल्या त्यांच्या बँक खात्यातून यूपीआई पेमेंट करता येईल.
स्कॅन अँड पे वैशिष्ट्यातून क्रेड अनुभव मिळतो- हा अनुभव विनाअडथळा, विश्वासार्ह पद्धतीने आणि आनंददायी होण्यासाठी क्रेडने काम केले आहे. त्यातून आमचे सदस्य जिथे कुठे जातील तिथे त्यांना पेमेंटसाठी वापर करता येईल. त्यामुळे क्रेड प्लॅटफॉर्मचा वापर वाढतो, सदस्यांसाठी क्रेडिट कार्डबरोबरच मूल्य मिळते आणि यूपीआईबाबत विश्वासही वाढतो. त्याचबरोबर मर्चंट भागीदारांसाठी नवीन संधींची निर्मिती होते. क्रेडच्या सदस्यांसाठी फ्लेअर्स अँड स्किन्ससोबत आणि भागीदार व्यापाऱ्यांसोबत २ पट रिवॉर्डस् देऊन यूपीआई पेमेंट अनुभव आगळावेगळा आणि वैयक्तिक करण्यात आला आहे. त्यामुळे पेमेंटचा अनुभव सुरक्षित आणि विश्वासू करण्यात आला आहे. त्यात अधिक गोपनीयता, पेमेंटचे रक्षण आणि पारदर्शकता डायनॅमिक मेसेजिंगसह उपलब्ध आहेत.
स्कॅन अँड पे फीचरची वैशिष्टे:
- विश्वासू
- पेमेंट प्रोटेक्शन – तुमची पेमेंट क्रेड संरक्षित आहेत. क्रेडवर प्रत्येक स्कॅन अँड पे पेमेंट संरक्षित आहे. पेमेंट अडकले असल्यास आणि प्राप्तकर्त्याच्या बँकेकडून निश्चितीच्या प्रतीक्षेत असल्यास क्रेडचे सदस्य काळजीत न पडता दुसरा व्यवहार सुरू करू शकतात. सदस्यांना या गोष्टीची खात्री असू शकते की, त्यांना पेमेंट वजा झाल्यास आणि प्राप्तीकर्त्यांना न पोहोचल्यास आणि नंतर यशस्वी झाले असे मानले गेल्यास पैसे परत मिळू शकतात. हे वैशिष्ट्य स्कॅन अँड पे वापरून क्रेड सदस्यांना फायदा म्हणून उपलब्ध आहे. अटी आणि शर्ती लागू*
- कस्टम व्हीपीएसोबत यूपीआई आयडी सुरक्षित करा- खऱ्या अर्थाने निनावी व्यवहार करा. एक वेगळा यूपीआई आयडी तयार करा. स्कॅन अँड पेचा वापर करत असताना क्रेड प्रोटेक्ट सदस्यांना एक वेगळा यूपीआई आयडी तयार करून आपली ओळख लपवण्यासाठी मदत करेल. त्यामुळे त्यांना वैयक्तिक तपशील जसे मोबाइल नंबर लपवता येतील, त्यामुळे पेमेंटदरम्यान गोपनीयता जपता येईल. कस्टम व्हीपीए कार्यरत झाल्यानंतर सदस्यांच्या दुसऱ्या यूपीआई आयडीमधून थेट पेमेंट केले जाईल.
- डिझाइन्ड फॉर डिलाइट
- कस्टमाइज करण्यायोग्य अनुभव – प्रत्येक पेमेंट सदस्यांवर लक्ष केंद्रित करते. स्कॅन अँड पेमधून ग्राहकांना आपल्या अॅपमध्ये काही वेगळी वैशिष्टे समाविष्ट करता येतील. सदस्यांना आपल्या स्कॅनरचे वैयक्तिकीकरण त्यांचे क्रेड कॉइन्स रिडीम करून करता येईल.
- फ्लेअर्स – निओपॉप- एक खास क्रेड डिझाइन भाषा. ती कलेला सदस्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवण्याच्या वचनावर तयार करण्यात आली आहे. सदस्य आता विशेषतः क्रेडच्या डिझायनर्सनी तयार केलेल्या कलावस्तूंची निर्मिती पाहू शकतात आणि ते स्वतःसाठी घेऊ शकतात. आर्टवर्क्सची पहिली मालिका युटोपियन ऑब्जेक्ट्सच्या संकल्पनेवर तयार केली गेली आहे. हा कलावस्तूंबाबतचा एक खास विचार आहे, जो आपण एका परफेक्ट जगात जगत असल्याप्रमाणे तुमच्या रोडच्या आयुष्याचा भाग होईल.
- कस्टमाइज करण्यायोग्य अनुभव – प्रत्येक पेमेंट सदस्यांवर लक्ष केंद्रित करते. स्कॅन अँड पेमधून ग्राहकांना आपल्या अॅपमध्ये काही वेगळी वैशिष्टे समाविष्ट करता येतील. सदस्यांना आपल्या स्कॅनरचे वैयक्तिकीकरण त्यांचे क्रेड कॉइन्स रिडीम करून करता येईल.
- रिवॉर्डिंग – पेमेंट्स रिवॉर्डिंग करण्याच्या क्रेडच्या वचनाचा विस्तार करताना स्कॅन अँड पेचा वापर करणाऱ्या सदस्यांना भागीदार मर्चंट्सवर २ पट रिवॉर्डस्, खास ब्रँड्सवर डील्स, कॅशबॅक्स आणि विशेष अनुभव मिळू शकतील.
- विनाअडथळा – एका क्यूआर कोडवर आपोआप झूम होणाऱ्या स्मार्ट स्कॅनर आणि स्मार्ट रेकमेंडशेनसोबत अगदी कमी प्रकाशातही स्कॅन अँड पेची रचना अत्यंत वेगवान, सुलभ अनुभवासाठी केली गेली आहे, जिथे एकाच स्कॅनमध्ये सर्व गोष्टी होतात.
कुणाल शाह, संस्थापक, क्रेड म्हणाले की, “क्रेडची रचना क्रेडिट विश्वासार्हता लक्षात घेऊन करण्यात आली होती. देशातील सर्वोच्च १ टक्के लोकांनी भारताच्या खरेदीसाठी व्यासपीठ तयार केले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या योगदानाचा गौरव करणारा एक अनुभव देणे गरजेचे आहे. भारत क्रांतीकारक मेड इन इंडिया उत्पादनांसह डिजिटल पेमेंट्समध्ये आघाडी घेत असून यूपीआई ही डेल्टा ४ सुयोग्यता पायाभूत सुविधा आहे, जी व्यापक प्रमाणात नावीन्यपूर्णता देते. हा नवीन क्रेड पे अनुभव प्रायव्हसी फर्स्ट फीचर्स, वैयक्तिकीकरण आणि सदस्यांचा वेगळेपणा यांच्यासह तयार करण्यात आला आहे.”
क्रेड पे वर स्कॅन अँड पे ने सुसज्ज असलेले रिटेल व्यापारी तात्काळ पेमेंट अनुभव देऊ शकतात, खास कंस्ट्रक्ट्स तयार करू शकतात आणि क्रेड सदस्य ग्राहकांसोबत खास संबंध निर्माण करू शकतात. हे भारतातील सर्वाधिक क्रेडिट सुयोग्य आहे आणि खर्चासाठी खूप फायदेशीर ठरेल. स्कॅन अँड पे वापरणाऱ्या क्रेड सदस्यांना खास रिवॉर्डस् देणारे भागीदार ब्रँड्स स्टारबक्स, शॉपर्स स्टॉप, पुमा आणि चायोस असे विविध प्रकारचे आहेत.
क्रेड पेवर स्कॅन अँड पे वैशिष्ट्याचा वापर कसा करायचा:
- पहिला टप्पा: क्रेड अॅप उघडा.
- दुसरा टप्पा: वरच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात स्कॅन अंड पे क्लिक करा किंवा डावीकडे स्वाइप करा. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर क्रेड अॅप आयकॉनवर लाँग प्रेस करू शकता आणि स्कॅन अँड पे ऑप्शनवर क्लिक करू शकता.
- तिसरा टप्पा: स्कॅनरवर कोणताही क्यूआर कोड स्कॅन करा किंवा यूपीआई आयडी समाविष्ट करू शकता.
- चौथा टप्पा: तुमचा यूपीआई पिन समाविष्ट करा.
- पाचवा टप्पा: पेमेंट मर्चंटला जाईपर्यंत डायनॅमिक मेसेजिंगद्वारे अपडेट्स दिले जाईपर्यंत प्रतीक्षा करा.
- सहावा टप्पा: प्रत्येक पेमेंटसाठी तुम्हाला मिळणाऱ्या रिवॉर्डचा आनंद घ्या. त्यात भागीदार मर्चंट्सवर २ पट रिवॉर्डसपासून, खास ब्रँड्सवर डील्स, कॅशबॅक्स आणि विशेष अनुभवांचा समावेश आहे.
एप्रिल २०१६ मध्ये सुरू झालेली युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही एक अशी यंत्रणा आहे, ज्यातून विविध बँक खाती एकाच मोबाइल अॅप्लिकेशनवर जोडली जातात. त्यामुळे विविध बँकिंग वैशिष्टे, सीमलेस फंड राऊटिंग आणि मर्चंट पेमेंट्स एकाच छताखाली करता येतात. त्यातून “पीअर टू पीअर” कलेक्ट रिक्वेस्टही वापरता येईल. तिचे वेळापत्रक ठरवून आवश्यकता आणि सुलभतेनुसार वापरता येऊ शकेल.
यूपीआईबाबत अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview