~ १ लाखांपेक्षा जास्त झाडे लावण्याची प्रतिज्ञा ~
१ ऑक्टोबर २०२२, मुंबई: पृथ्वीवरील पर्यावरण हा सजीव सृष्टीचा पाया आहे, तो सुरक्षित राखला जावा ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचे पालन करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी जास्त चांगले, हरित आणि स्वच्छ भविष्याच्या उभारणीसाठी टायटन कंपनीने ‘गो ग्रीन‘ उपक्रम सुरु केला आहे. १ लाखांहून जास्त झाडे लावून भारताला अजून जास्त हरित बनवण्याच्या दिशेने कंपनीने पावले उचलली आहेत. पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी टायटन कंपनी लिमिटेडने सुरु केलेल्या ‘गो ग्रीन‘ उपक्रमाची सुरुवात मॅरेथॉन रिले व पंतनगर ते बंगलोर या मार्गावर झाडे लावण्याच्या सामूहिक संकल्पाने अतिशय अनोख्या पद्धतीने करण्यात आली आहे. १० सप्टेंबर २०२२ रोजी पंतनगर येथे टायटन ‘गो ग्रीन‘ रनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. दिल्ली, जयपूर, आझमगढ, लखनौ, चंदिगढ, अहमदाबाद, वडोदरा या शहरांमधून १ ऑक्टोबर रोजी ही मॅरेथॉन रन मुंबईला पोचली व आपल्या पुढील उद्दिष्टाच्या दिशेने तिचा प्रवास वेगाने सुरु आहे.
‘गो ग्रीन‘ उपक्रमांतर्गत टायटन कंपनी वृक्षारोपण अभियान चालवणार आहे. यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. बायोटासॉईल फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था, टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर यांच्या सहयोगाने हे अभियान राबवण्यात येणार आहे.
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी टायटन कंपनी वचनबद्ध आहे. पर्यावरणानुकूल जीवन हा सर्वांच्या जीवनशैलीचा भाग बनावा यासाठी ही कंपनी सदैव प्रयत्नशील असते. आपल्या या वचनबद्धतेमध्ये टायटनने समाजाला देखील सहभागी करवून घेतले आहे. झाडे लावून, त्यांची नीट देखभाल करून कोणीही व्यक्ती टायटनच्या या पर्यावरण उपक्रमात आपले योगदान देऊ शकते. पुढील तीन सोप्या मार्गांनी टायटनच्या ‘गो ग्रीन‘ उपक्रमात सहभागी होता येईल.
#१ वृक्षारोपण अभियानात सहभागी व्हा.
#२ एक किंवा अनेक झाडे स्पॉन्सर करा.
#३ संकल्प करा आणि छोटे पण महत्त्वपूर्ण बदल घडवून आणा.
टायटनने सुरुवातीपासूनच अनेक वेगवेगळे पर्यावरण संरक्षण व संवर्धन उपक्रम चालवले आहेत:
- टायटनमधील उत्पादन प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारी ७५% पेक्षा जास्त ऊर्जा पवन आणि सौर ऊर्जेतून पुरवली जाते.
- टायटनच्या सीएसआर प्रयत्नांमधून तलावांचा कायाकल्प घडवून आणण्यात आला आहे, रोधी धरणे बांधण्यात आली आहेत, देशभरात त्यांनी हजारो झाडे लावली आहेत. होसूर येथे दोन मियावाकी जंगले उभारली आहेत.
- आपल्या कॉर्पोरेट ऑफिसच्या जवळच्या एका मोठ्या तलावाचा कायाकल्प घडवून आणून टायटनने या तलावाला तसेच पंतनगरमधील एका छोट्या जलाशयाला पुनरुज्जीवन प्राप्त करवून दिले आहे.
यावेळी टायटन कंपनी लिमिटेडचे ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ श्री. अजॉय चावला म्हणाले, “टायटन ‘गो ग्रीन‘ हा काही फक्त एक उपक्रम नाही तर निसर्ग संवर्धनासाठी उचललेले विचारशील पाऊल आहे. आमच्या अनोख्या पुनरुज्जीवन प्रोग्राममार्फत शाश्वत, पर्यावरणानुकूल मानसिकता निर्माण केली जावी आणि सामूहिक संकल्पाच्या माध्यमातून जबाबदारीची जाणीव निर्माण केली जावी हा टायटनचा उद्देश आहे. आम्ही असे मानतो की, या दिशेने उचलण्यात आलेले प्रत्येक छोटे पाऊल खूप महत्त्वाचे आहे आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी पर्यावरणस्नेही पर्यायांचा जाणीवपूर्वक स्वीकार करून संतुलन पुनर्स्थापित करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे.”
कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटीचे एव्हीपी व हेड श्री. एन. ई. श्रीधर म्हणाले, “आमच्या सर्व संचालनांमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वत्र पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा समावेश करण्यासाठी टायटन कंपनीमध्ये आम्ही नेहमीच जाणीवपूर्वक व सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो. जबाबदारीचे पुरेपूर भान असलेली एक कंपनी या नात्याने आणि ‘गो ग्रीन‘ उपक्रम सुरु होत असल्याच्या निमित्ताने आमचे भागीदार व हितधारकांच्या सहयोगाने, वातावरणातील बदलांबाबत जागरूकता घडवून आणणे तसेच पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रक्रिया व प्रथांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
अधिक माहितीसाठी आणि टायटन ‘गो ग्रीन‘ उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा: https://gogreen.titancompany.in/