भारतातून आत्तापर्यंत ८०,००० पर्यटक श्रीलंकेत आले असून २०२३ पर्यंत हा आकडा दुपटीने वाढणे अपेक्षित
मुंबई : सप्टेंबर २०२२ : श्रीलंका भारताबरोबरचे आपले परस्पर आणि सांस्कृतिक संबंध अधिक विस्तारत असून त्यासाठी प्रमुख भारतीय शहरांमध्ये रोड शोंची एक मालिकाच आयोजित करण्यात आली आहे. २६ ते ३० सप्टेंबर २०२२दरम्यान हे रोड शो आयोजित करण्यात आले आहेत. पहिला रोड शो नवी दिल्ली येथे २६ सप्टेंबर रोजी ताज पॅलेस हॉटेलयेथे आयोजित करण्यात आला असून पुढील शो २८ सप्टेंबर रोजी मुंबईत सेंट रेगीस येथे होणार आहे. तिसरा आणि अंतिम शो ३० सप्टेंबर २०२२ रोजी हैदराबाद येथे ताज कृष्ण हॉटेल येथे होणार आहे.
या रोड शोंचा प्रमुख उद्देश हा श्रीलंकेचा भारतात एक सक्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रसार करणे हा आहे. भारत ही श्रीलंकेसाठी एक प्रमुख अशी बाजारपेठ असून या बाजारपेठेने श्रीलंकेला कोविड साथरोग आणि सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात काहीशा मंदीतून पुन्हा उभारी घेण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. श्रीलंकेमध्ये पर्यटकांची संख्या सध्या वाढली असून त्यात भारतातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्या माध्यमातून परदेशी पर्यटकांच्या बाबतीत भारत एक क्रमांकावर आहे.
पर्यटनाच्या बाबतीत उच्च असा अनुभव ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी या शोंचे आयोजन करण्यात आले असून त्या माध्यमातून इच्छुक पर्यटकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. त्याचबरोबर श्रीलंका हे विश्रांती, व्यवसाय आणि एमआयसीई(मिटिंग, इन्सेन्टीव्ह, कॉन्फरन्स, एक्झीबीशन) या सर्वच प्रकारच्या पर्यटनासाठी उपलब्ध आहे, हा सकारात्मक संदेश द्यायचा आहे.
या रोड शोंच्या माध्यमातून सर्व लक्ष हे टूर ऑपरेटर, माध्यमे, प्रभाव टाकणारे महत्त्वाचे लोक, कॉर्पोरेट आणि ट्रेड असोसिएशन तसेच भारतातील पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचे भागधारक यांच्यावर असणार आहे. त्या माध्यमातून श्रीलंका हा सुंदर देशांपैकी एक देश तर आहेच पण तो सुरक्षितही आहे आणि तो आरोग्य व सुरक्षेची सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळतो, हा संदेश देण्याची क्षमता असलेल्यांशी संपर्क करण्याचा हेतू आहे.
५० स्थानिक ट्रॅव्हेल एजन्सी आणि हॉटेल यांचे एक प्रतिनिधी मंडळ या आयोजनामध्ये सहभागी होत असून या प्रतिनिधी मंडळाचे प्रतिनिधित्त्व पर्यटन मंत्री श्री हरीन फर्नांडो करणार आहेत. त्यांच्यासोबत श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरोचे अध्यक्ष श्री चलाका गजाभाऊ आणि श्रीलंका कन्व्हेन्शन्स ब्युरोचे अध्यक्ष श्री थीसुम जयसूर्या असणार आहेत. अनेक उद्योग भागधारकांनी या उपक्रमाला सहकार्य केले असून त्यात श्रीलंकन एअरलाइन्स आणि मास्टरकार्ड यांचा समावेश आहे.
प्रत्येक रोड शोमध्ये बी2बी सत्रांचा समावेश असून त्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा साधली जाणार आहे. त्यासाठी इव्हिनिंग नेटवर्किंग कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.त्याद्वारे व्यवसाय भागीदारी अधिक विस्तृत केली जाणार आहे.
या सर्व आयोजनांना एक ग्लॅमरची झालर देण्यासाठी अनेक मान्यवरांचा त्यात समावेश केला जाणार आहे. त्यांत क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांचाही समावेश असणार आहे. प्रत्येक आयोजनामध्ये नृत्य आणि मनोरंजनाचा समावेश असेल आणि त्या माध्यमातून प्रेक्षकांना श्रीलंकन संस्कृतीच्या झलकेबरोबर एक वेगळा अनुभव उपलब्ध करून दिला जाईल.नृत्यकलाकार त्यांच्या प्रतिभेची एक झलक यावेळी दाखवणार आहेत.या रोडशोदरम्यान पर्यटनमंत्री हे अनेक उच्चपदस्थ व्यवसाय अधिकारी, पर्यटन क्षेत्रातील भागधारक आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भेटणे अपेक्षित आहे. त्याशिवाय भारतातील आघाडीच्या माध्यमांबरोबर मुलाखतींचेही आयोजन करण्यात आले आहे.