मुंबई, २९ सप्टेंबर २०२२ : गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स या हिंदुजा समूहाच्या कंपनीने पियाजिओ व्हिइकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) आणि स्विच मोबिलिटी यांच्याशी ईव्ही फ्लुईड्सची खास श्रेणी तयार करण्यासाठी भागिदारी केल्याचे जाहीर केले आहे. या भागिदारीमुळे गल्फ ऑइलद्वारे पियाजिओ व्हिइकल्स आणि स्विच मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक वाहन श्रेणीला त्यांची कार्यक्षमता व कामगिरी सुधारण्यासाठी ईव्ही फ्लुईड्सचा पुरवठा केला जाणार आहे. या लाँचप्रसंगी गल्फ ऑइलचे अध्यक्ष श्री. संजय हिंदुजा आणि प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू व ब्रँड अम्बेसिडर महेंद्र सिंग धोनी यावेळी उपस्थित होते.
या भागिदारीच्या माध्यमातून पियाजिओ व्हिइकल्स आणि स्विच मोबिलिटीला गल्फच्या श्रेणीतील ईव्ही फ्लुईड्सची संपूर्ण श्रेणी थेट उपलब्ध होईल. ही ईव्ही फ्लुईड्स पियॅजिओची ईव्ही पॅसेंजर आणि कार्गो व्हेरियंटमध्ये, तर स्विच मोबिलिटीच्या स्विच ईआयव्ही १२ आणि स्विच ईआयव्ही २२ या ईव्ही व्हेरियंटमध्ये वापरली जातील.
भागिदारीविषयी गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी चावला म्हणाले, ‘गल्फ ऑइलकडे असलेल्या जागतिक स्तरावरील ईव्ही फ्लुईड्सची भारतात पियाजिओ व्हिइकल्स आणि स्विच मोबिलिटीशी भागिदारी करण्यात आली आहे. पियॅजिओ थ्री व्हीलर ईव्ही ट्रान्समिशनसाठी सर्वोत्तम कामगिरीची खात्री देणाऱ्या या दर्जेदार उत्पादनाची निवड हे त्याच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे. स्विच मोबिलिटीसाठी आम्ही उपलब्ध करत असलेली उत्पादने त्यांच्या इलेक्ट्रिक बसेससाठी संपूर्ण श्रेणीच्या माध्यमातून असामान्य कामगिरीची खात्री देणारी असून त्यांमध्ये कुलंट्स व ट्रान्समिशन फ्लुईड्सचा समावेश असेल. प्रत्येक ओईएम कराराच्या माध्यमातून गल्फ ऑइल तीन चाकी, चार चाकी आणि बस ईव्ही विभागात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. आता पियाजिओ व्हिइकल्स आणि स्विच मोबिलिटीच्या ग्राहकांना आमची सर्वोत्तम उत्पादने, आणि अनुभवासह सुधारित कामगिरी त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनाकडून मिळवणे सहज शक्य होईल.’
गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लि.चे अध्यक्ष संजय हिंदुजा म्हणाले, ‘इलेक्ट्रिक वाहतुकीसह वाहन उद्योगात एक नवा अध्याय सुरू होत असून ल्युब्रिकंट्स क्षेत्रात तंत्रज्ञानाच्याबाबतीत आघाडीवर असेलली कंपनी या नात्याने या क्षेत्राला दिशा देणे आणि ईव्ही उद्योगाला चालना देणारी उत्पादने विकसित करणे ही आमची जबाबदारी आहे. पियाजिओ व्हिइकल्स आणि स्विच मोबिलिटीसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी आमची उत्पादने स्वीकारणे हे ईव्ही क्षेत्रासाठी अत्याधुनिक उत्पादने तयार करण्याच्या आमच्या बांधिलकीचे निदर्शक आहे.’
स्विच मोबिलिटी लि.चे सीओओ आणि स्विच इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘शहरी वाहतूक वेगान बदलत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नेट झिरो साध्य करण्यात स्विच आघाडीवर आहे. स्विच ईआयव्ही १२ आणि स्विच ईआयव्ही २२ या उत्पादनांच्या माध्यमातून आम्ही कार्यक्षमता, तंत्रज्ञान, कामकाजाचा योग्य खर्च अशा प्रकारच्या सुविधा देत आहोत. गल्फ इलेमॅक्स ही उच्च कामगिरी करणारी ईव्ही फ्लुइड्सची श्रेणी विकसित करण्यासाठी गल्फ ऑइलसह केलेल्या भागिदारीमुळे ग्राहक व एंड युजरला सर्वोत्तम रिझल्ट्स मिळतील. गल्फ ऑइलबरोबर असलेले आमचे सहकार्य यापुढेही सुरू राहील व त्याअंतर्गत आमच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीला लाभ करून दिला जाईल.’
पियाजिओ व्हिइकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अद्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डियागो ग्राफी म्हणाले, ‘आम्ही गल्फ ऑइल्सशी आमच्या आयसीई वाहनांसाठी ल्युब्रिकंट्सची विस्तृत श्रेणी पुरवण्यासाठी यशस्वी भागिदारी केली आहे. ग्राहकांना उच्च कामगिरी देणारी उत्पादने पुरवण्यासाठी आम्ही गल्फ ऑइलसह ईव्ही व्हेरियंट्सवर काम करत आहोत. आम्हाला आशा आहे, की आमची प्रदीर्घ भागिदारी भारतात ईव्ही वापराला आवश्यक चालना देईल.’
गल्फ ऑइलने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ईव्ही फ्लुईड्सची विशेषतः खास प्रकारे तयार केलेल्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी लाँच केली होती व त्यात ईव्ही आणि हायब्रीड वाहनांसाठी गल्फ फॉर्म्युला हायब्रीड तसेच गल्फ ईलेक कुलंट, गल्फ इलेक ड्राइव्हलाइन फ्लुईड आणि गल्फ इलेक ब्रेक फ्लुईड यांचा समावेश होतो. भारतात शाश्वत वाहतूक क्षेत्राचा विकसित करण्यासाठी सज्ज होण्याच्या दृष्टीकोनातून गल्फ ऑइलने इलेक्ट्रीफाय आणि ईव्ही सास पुरवठादार व इंद्रा टेक्नोलॉजीज या युकेस्थित चार्जर/मोबिलिटी कंपनीशी करार केला आहे.
शाश्वत यंत्रणा तयार करण्याचे व्हिजन आणि इलेक्ट्रिक वाहतुकीप्रती बांधिलकी यांसह गल्फ ऑइलने अडब्लू आणि दुचाकी बॅटरी क्षेत्रात आपला व्यवसाय विस्तार करण्याचे ठरवले आहे.